ETV Bharat / entertainment

Shahid Kapoor and Kriti Sanon : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपटाची रिलीज डेट आली समोर...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 1:48 PM IST

Shahid Kapoor, Kriti Sanon : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन अभिनीत चित्रपट 2024 व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी डिसेंबर 2023 मध्ये रुपेरी पडद्यावर येणार होता. या चित्रपटाचं नाव मात्र अजुनही ठरलेलं नाही.

Shahid Kapoor and Kriti Sanon
शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन

मुंबई - Shahid Kapoor, Kriti Sanon : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन त्यांच्या आगामी चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. दिनेश विजानच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही, तरीही चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन पहिल्यादांच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या दोघांनीही इंडस्ट्रीत बराच काळ घालवला आहे. शाहिद आणि क्रितीची गणना बॉलिवूडमधील उत्तम कलाकारांमध्ये केली जाते. क्रिती 'मिमी'साठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आली आहे. दिनेश विजानचा हा चित्रपट रोमँटिक असणार आहे.

शाहिद आणि क्रिती पहिल्यांदा दिसेल एकत्र : शाहिद आणि क्रितीच्या या आगामी चित्रपटाचं शीर्षक हे 'अन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी'असू शकते, अशा बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. या चित्रपटाची रिलीज डेट मात्र, आता निश्चित करण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिद-क्रितीची ही प्रेमकहाणी असल्यामुळे हा चित्रपट 2024 व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखक अमित जोशी आणि आराधना शाह यांनी केलं आहे. शाहिद आणि क्रिती स्टारर चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर आणि ज्योती देशपांडे करणार आहेत.

वर्कफ्रंट : या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. दरम्यान शाहिद कपूर वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'ब्लडी डॅडी'मध्ये दिसला होता. शाहिदचा हा चित्रपट जिओ सिनेमावर उपलब्ध आहे. दुसरीकडे, क्रिती साऊथ अभिनेता प्रभाससोबत आदिपुरुषमध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यानंतर क्रिती ही टायगर श्रॉफसोबत 'गणपत भाग 1' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन, एली एवराम आणि शारिक खान दिसणार आहेत. या चित्रपटाकडून क्रितीला खूप अपेक्षा आहे. 'गणपत भाग 1' हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.

हेही वाचा :

  1. Box office collection day 6 : बॉक्स ऑफिसवर 'फुक्रे 3' हा चित्रपट 'चंद्रमुखी 2', आणि 'द व्हॅक्सिन वॉर'ला देत आहे जोरदार टक्कर...
  2. Bipasha Basu : बिपाशा बसूनं इंस्टाग्राम स्टोरीजवर बूमरँग क्लिप केली शेअर ; पाहा व्हिडिओ...
  3. Hrithik Roshan : 'हू इज युअर गायनेक' या वेब सीरिजसाठी हृतिक रोशननं केलं गर्लफ्रेंड सबा आझादचं कौतुक...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.