ETV Bharat / entertainment

'महाभारत' फेम शाहीर शेखची पत्नी रुचिका कपूरनं गोंडस मुलीला दिला जन्म - शाहीर झाला वडील

Shaheer and Ruchika Second Baby : अभिनेता शाहीर शेख आणि रुचिका कपूर यांना दुसरं अपत्य झालं आहे. रुचिकानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Shaheer and Ruchika Second Baby
शाहीर आणि रुचिकाचं दुसरे बाळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 11:37 AM IST

Updated : Jan 1, 2024, 12:02 PM IST

मुंबई - Shaheer and Ruchika Second Baby : टीव्ही इंडस्ट्रीतील अर्जुन म्हणजेच अभिनेता शाहीर शेखनं नवीन वर्षाची सुरुवात एका गुड न्यूज देऊन केली आहे. शाहीर शेख आणि रुचिका कपूर या दोघांनीही आपल्या घरी एका गोंडस मुलीचं स्वागत केलं आहे. शाहीर आणि रुचिका यांचं 2020 साली लग्न झालं. त्यानंतर शाहीर आणि रुचिका 2021 मध्ये पहिल्यांदा पालक झाले. रुचिकानं एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिनं मुलगी अनायाची बहीण कुदरतशी लोकांना ओळख करून दिली आहे.

रुचिका कपूरनं शेअर केला फोटो : शेअर केलेल्या फोटोत दोन मुली दिसत आहेत. चेहरा दिसत नसला तरी, कॅप्शन आणि लोकांच्या अभिनंदनावरून शाहीर शेख दुसऱ्यांदा वडील झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या फोटोनं चाहत्यांना सुरुवातीला गोंधळात टाकलं आहे. रुचिका कपूरच्या कॅप्शननं सर्वांना आनंदी केलं आहे. फोटोत रुचिका आणि शाहीरच्या दोन्ही मुली एकत्र दिसत आहेत. या जोडप्याच्या मुली बेडवर खेळताना दिसत आहेत. रुचिकानं पोस्टद्वारे तिच्या दुसऱ्या मुलीचं नाव कुदरत असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. दरम्यान या जोडप्याला टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून खूप शुभेच्छा मिळत आहेत.

शाहीर शेखच्या चाहत्यांना झाला आनंद : रुचिका कपूरच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, ''रुचिका तु गर्भधारणेदरम्यान काम केलं हे खरोखर खूप सुंदर आहे''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''रुचिका कुदरत नाव हे सुंदर आहे''. त्यानंतर आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''रुचिका खूप खूप अभिनंदन''. अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. शाहीर शेख आणि रुचिका त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप गोपनीय ठेवतात. 19 ऑक्टोबर 2020 रोजी दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं. यानंतर शाहीरनं एका इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे लग्नाची बातमी दिली होती. या जोडप्यांनी आजवर आपल्या मुलींनाही सोशल मीडियापासून दूर ठेवलं आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान स्टारर 'डंकी'नं बॉक्स ऑफिसवर केला धमाका
  2. अक्षय कुमारनं पीएम मोदींच्या 'मन की बात'मध्ये दिला फिटनेस मंत्र
  3. अमिताभ बच्चन यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी केबीसीच्या सेटला दिला अखेरचा निरोप

Last Updated : Jan 1, 2024, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.