ETV Bharat / entertainment

शाहरुख खानने मक्कामध्ये केला उमराह, फोटो व्हायरल

author img

By

Published : Dec 2, 2022, 12:45 PM IST

शाहरुख खानने नुकतेच सौदी अरेबियामध्ये डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले, त्यानंतर तो उमराह करण्यासाठी मक्का येथे पोहोचला होता. इथून त्याचे पांढऱ्या चादरीतील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या जगभर चर्चेत आहे. शाहरुख खानने नुकतेच सौदी अरेबियामध्ये 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, त्यानंतर तो उमराह करण्यासाठी मक्का येथे पोहोचला होता. येथून पांढर्‍या चादरीतील त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शाहरुख खाननेही चेहऱ्यावर मास्क लावला आहे. शाहरुख खानच्या या फोटोंची सगळीकडे चर्चा होत आहे. उमराहनंतर शाहरुख रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसला.

फॅन्स करत आहेत कमेंट - शाहरुख खानचे मक्केतील हे फोटो पाहून त्याचे फॅन्स आश्चर्यचकित झाले असून ते त्यावर कमेंट करत आहेत. अनेक चाहत्यांनी शाहरुखला या स्टाईलमध्ये कधीच पाहिले नसल्याचे सांगत आहेत. सौदी अरेबियातील एका पत्रकाराने ट्विटद्वारे या बातमीला दुजोरा दिला आहे की शाहरुख खरोखरच मक्काला पोहोचला आहे. येथे त्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

'डंकी' चित्रपट कधी प्रदर्शित होणार - राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. मात्र, राजकुमारने शाहरुख खानला 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाची ऑफर दिली होती, जी काही कारणास्तव शाहरुखने नाकारली. आता 'डंकी' चित्रपटातून राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानची जोडी किती अप्रतिम आहे, हे चित्रपटाच्या (२२ डिसेंबर २०२३) रिलीजनंतरच कळेल.

'डंकी' चित्रपट बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून स्थलांतरित झालेल्यावर आधारित आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा - बोमन इराणी वाढदिवस: अष्टपैलू अभिनेत्याने साकारलेल्या ५ संस्मरणीय भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.