ETV Bharat / entertainment

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल

शाहरुख खानच्या दक्षिणेकडील दिग्दर्शकासोबतच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल, बॉलिवूडचा किंग खान एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे शीर्षक जवान असणार आहे. हे पोस्टर आता त्याच्या फॅन्समध्ये व्हायरल झाले आहे.

author img

By

Published : Jun 3, 2022, 9:58 AM IST

मुंबई - शाहरुख खान साऊथ चित्रपटातील तरुण दिग्दर्शक एटली कुमारसोबत एक चित्रपट करत आहे. त्याची घोषणा फार पूर्वी झाली होती. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक 'जवान' असेल अशी बातमी आली होती. अशा परिस्थितीत शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅन्स क्लब हे सर्व जोरात शेअर करत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये शाहरुख खानचा लूक वेगळा दिसत आहे.

'जवान'चा फर्स्ट लूक व्हायरल - एटलीसोबत शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शाहरुख खान बादशाहच्या खुर्चीवर बसला आहे. त्याने टोपी घातली आहे. काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये दिसणार्‍या शाहरुखच्या डोळ्यात लेन्सही दिसत आहेत. या पोस्टरच्या तळाशी जवान चित्रपटाचे नाव लिहिले आहे.

'डंकी' आणि 'पठाण' चित्रपटांसह शाहरुख खानने एका प्रोजेक्टसाठी साऊथ चित्रपटांचे हिट डायरेक्टर एटली कुमार यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख रवाना झाला असून आता तो पुन्हा पुन्हा हौशी फोटोग्राफर्सच्या नजरेस पडत आहे.

हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा एक रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा रोमान्स करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव आधी लायन (LION) असे सांगितले जात होते.

जवान निर्माते चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्याची तयारी करत आहेत, ज्यामध्ये शाहरुख खानचा दमदार अवतार पाहायला मिळणार आहे. हा टीझर 1 मिनिट 34 सेकंदाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटांसाठी 25 टायटल्सवर चर्चा झाली होती, त्यानंतर या चित्रपटाचे नाव जवान ठेवण्यात आले आहे.

शाहरुख पुन्हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे - या चित्रपटात शाहरुख खानची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका केल्या आहेत. अभिनेत्री नयनतारा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत.

हेही वाचा - अमजद खान व त्यांचे वडील जयंत यांचा 'अलवर'शी घनिष्ठ नाते, जाणून घ्या 'गब्बर'च्या वडीलांबद्दल!!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.