ETV Bharat / entertainment

Sara Ali Khan On Cannes red carpet : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांच्या नजरा सारा अली खानवर ; डेब्यू लूकने सर्वांना केले मंत्रमुग्ध - विकी कौशल

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023: अभिनेत्री सारा अली खानच्या कान्स डेब्यू लूकने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री उत्साही दिसत होती.

Sara Ali Khan
सारा अली खान
author img

By

Published : May 17, 2023, 11:00 AM IST

फ्रान्स: फ्रेंच रिव्हिएरामध्ये मंगळवारपासून 76वा कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. जगातील या सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सहभागी होत आहेत, त्यापैकी अनेकजण पहिल्यांदाच येथे पोहोचत आहे. अभिनेत्री सारा अली खानने मंगळवारी कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पहिल्याच आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर हजेरी लावली. कान्स पदार्पण करणाऱ्यांमध्ये अनुष्का शर्मा , ईशा गुप्ताही, मानुषी छिल्लर आणि सारा अली खान यांचा समावेश आहे. सारा अली खान पहिल्याच दिवशी कान्स 2023 च्या रेड कार्पेटवर आली तेव्हा तिने तिच्या लूकने सर्वांनाच थक्क केले.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांच्या नजरा सारावर : या प्रसंगी सारा ही 'देसी ग्लॅम' वधूच्या स्टाईलमध्ये दिसली, या वेशभूशेत सारा ही मोहक दिसत होती. यावेळी तिच्या उपस्थितीचे कौतुक केल्या गेले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी, अभिनेत्री कान्स 2023 च्या उद्घाटन समारंभात तिच्या जबरदस्त ऑफ-व्हाइट 'लेहेंगा' मध्ये देसी झाली होती त्यामुळे तिथेल उपस्थित असणाऱ्याच्या नजरा तिच्यावर होत्या. तिच्या कान्स डेब्यूसाठी सुंदर ड्रेस भारतीय फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केली होती.

रेड कार्पेटवर साराने केला सौदर्या जादू : रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या शटरबग्सशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'मला नेहमीच इथे येण्याची इच्छा होती आणि मी इथे आहे यावर माझा विश्वासच बसत नाही.' तिच्या लूकबद्दल बोलताना सारा म्हणाली, 'हे अबू आणि संदीप (खोसला) यांनी तयार केलेले पारंपारिक आधुनिक भारतीय हँडमेड डिझाइन आहे.मला माझ्या भारतीयत्वाचा नेहमीच अभिमान वाटतो. मी कोण आहे हे प्रतिबिंबित करते, हे आधुनिक आहे आणि पारंपारिक आहेत. सारा अली खान कामाबद्दल बोलायला गेल तर तिचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'जरा हटके जरा बच के' हा विकी कौशलसोबत येणार आहे. तसेच सध्याला सारा ही विकी कौशलसोबत प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. व्यतिरिक्त तिचा जगन शक्ती दिग्दर्शित 'ए वतन मेरे वतन' आणि होमी अदजानियाच्या 'मर्डर मुबारक' या चित्रपटात ती झळकणार आहे.

हेही वाचा : Sunny Leone on Cannes red carpet : कान फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर सनी लिओनी दाखवणार जलवा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.