ETV Bharat / entertainment

Sanjay Dutt First Look: संजय दत्तचा 'डबल इस्मार्ट' लूक, साकारणार खतरनाक 'बिग बुल' - संजय दत्तचे फर्स्ट लूक

संजय दत्त साऊथ चित्रपट 'डबल इस्मार्ट'मध्ये खलनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय 'बिग बुल'ची भूमिका साकारत असून तो या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.

Sanjay Dutt First Look
संजय दत्त फर्स्ट लूक
author img

By

Published : Jul 29, 2023, 3:20 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाचा हा दिवस संजय दत्तसाठी खूप खास आहे. आज २९ जुलै रोजी संजय दत्त ६४ वर्षाचा झाली असून या खास दिवशी त्याने त्यांच्या चाहत्यासाठी एक खास भेट दिली आहे. 'डबल इस्मार्ट' या साऊथ चित्रपटामधील संजय दत्तचे फर्स्ट लूक समोर आले आहे. या लूकमध्ये संजय खूप हटके दिसत आहे. संजय दत्त हळुहळु साऊथ सिनेसृष्टीत आपला पाय रोवत आहे. 'केजीएफ' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर संजय दत्तला एकामागून एक साऊथ चित्रपटांच्या ऑफर येत आहेत.

'डबल स्मार्ट' चित्रपट : साऊथ चित्रपटसृष्टीत संजयला खूप काम मिळत आहे. 'डबल इस्मार्ट' या चित्रपटामधील त्याचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर संजयची खूप चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेते पुरी जगन्नाध हे करत आहेत या चित्रपटात साऊथ अभिनेता राम पोथीनेनी हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'केजीएफ' या ब्लॉकबस्टर चित्रपटामधली संजय दत्तची भूमिका खूप गाजली होती. दरम्यान हा चित्रपट 'स्मार्ट शंकर'चा सीक्वल असून या चित्रपटात संजय दत्त 'बिग बुल' खलनायकच्या भूमिकेत दिसणार आहे.

पोस्टमध्ये संजयने काय लिहले : जनसामान्यांचे दिग्दर्शक पुरीजगन्नाधजी आणि तरुण उत्साही उस्ताद राम पोथीनेनी यांच्यासोबत काम करताना मला खूप अभिमान वाटला. या साय-फाय मास एंटरटेनर 'डबल इस्मार्ट'मध्ये 'बिग बुल' साकारताना मला आनंद झाला. या सुपर-टॅलेंटेड टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची वाट पाहत आहे. असे संजयने त्यांच्या पोस्टमध्ये लिहले आहे.

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित : 'डबल इस्मार्ट' हा चित्रपट मार्च २०२४ रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. संजय दत्तच्या चाहत्यांना त्यानी दिलेली ही भेट खूप आवडली आहे. त्यामुळे संजयच्या या पोस्टवर खूप कमेंट येत आहे. संजयचे चाहते त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छासोबत त्यांचे अभिनंदन करत आहे. त्याच्या लूकवर त्याच्या एका चाहत्याने पोस्टवर त्याला एक नंबर लूक म्हटले आहे. याशिवाय एका चाहत्यांनी त्याला भाई तुमचा चित्रपट येणार आहे असे विचारले आहे. संजयच्या या पोस्टवर अनेक कमेंट येत आहे.

हेही वाचा :

  1. RARKPK box office collection day 1 :'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली धमाकेदार कमाई...
  2. Hemant Dhome : 'रॉकी और रानी...'मध्ये क्षिती जोगला पाहून हेमंत ढोमेला झाले आकाश ठेंगणे!!
  3. Bawaal under fire : ओटीटीवरुन 'बवाल' चित्रपट काढून टाका, ज्यू संघटनेची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.