मुंबई - Salaar movie : अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'सालार'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. अनेकजण या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. दरम्यान आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. रविवारी 17 डिसेंबर रोजी 'सालार' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख समोर आली आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर चाहते चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल खूप उत्सुक आहेत. 'सालार'चं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. या चित्रपटाचं बजेट 400 कोटी आहे. 'सालार' चित्रपटाला संगीत रवी बसरूर यांनी दिलंय. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. 'सालार'चं ट्रेलर हे 18 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
-
𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 𝐏𝐔𝐍𝐂𝐇 💥 #SalaarReleaseTrailer at 10:42 AM tomorrow.#Salaar #SalaarCeaseFire #SalaarCeaseFireOnDec22 #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @VKiragandur @hombalefilms #HombaleMusic @IamJagguBhai @sriyareddy @RaviBasrur @bhuvangowda84…
— Hombale Films (@hombalefilms) December 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 𝐏𝐔𝐍𝐂𝐇 💥 #SalaarReleaseTrailer at 10:42 AM tomorrow.#Salaar #SalaarCeaseFire #SalaarCeaseFireOnDec22 #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @VKiragandur @hombalefilms #HombaleMusic @IamJagguBhai @sriyareddy @RaviBasrur @bhuvangowda84…
— Hombale Films (@hombalefilms) December 17, 2023𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 𝐏𝐔𝐍𝐂𝐇 💥 #SalaarReleaseTrailer at 10:42 AM tomorrow.#Salaar #SalaarCeaseFire #SalaarCeaseFireOnDec22 #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @VKiragandur @hombalefilms #HombaleMusic @IamJagguBhai @sriyareddy @RaviBasrur @bhuvangowda84…
— Hombale Films (@hombalefilms) December 17, 2023
'सालार' चित्रपटाबद्दल : होंबळे फिल्म्स निर्मित या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, मीनाक्षी चौधरी, पृथ्वीराज सुकुमारन, सरण शक्ती, जगपती बाबू, टिन्नू आनंद आणि इतर कलाकार आहेत. दरम्यान 'सालार' या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या तिकिटे खूप वेगानं विकली जात आहेत. 'सालार'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आणखी चित्रपटाच्या तिकिटं विकली जातील असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटाचं पहिले तिकिट आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना देण्यात आलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडलं अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत.
प्रभासचा 'आदिपुरुष' चित्रपट : प्रभासला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत, कारण याआधी त्याचा 'आदिपुरुष' हा चित्रपट खूप वाईटरित्या फ्लॉप झाला होता. या चित्रपटाचं बजेट 500 कोटी होतं, आदिपुरुष'नं रुपेरी पडद्यावर 353 कोटीची कमाई केली. या चित्रपटामध्ये प्रभास व्यतिरिक्त सैफ अली खान, क्रिती सेनॉन, देवदत्त नागे, सनी निज्जर, सोनल चौहान, तृप्ती तोरडमल, वत्सल शेठ, तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकार होते. 'आदिपुरुष'चं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलंय. प्रभासचा हा चित्रपट प्रचंड वाद सापडला होता, त्यामुळं या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला होता.
हेही वाचा :