मुंबई - Salaar box office collection day 1 prediction : 'सालार : भाग 1 -सीझफायर' चित्रपटानं प्रभासच्या चाहत्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण केलं आहे. या बहुप्रतिक्षित रिलीजचं प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केलंय. 'आदिपुरुष'ला मिळालेल्या अपयशानंतर प्रभासने प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपटातून पुनरागमनाचा प्रयत्न केला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कचे सुरुवातीचे अंदाज बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कलेक्शनचे आकडे दर्शवतात. 'सालार'चे भारतातील पहिल्या दिवसाचे कलेक्शन अंदाजे 95 कोटी असेल असा आडाखा बांधला जातोय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'सालार' चित्रपटाची निर्मिती गेल्या दोन वर्षापासून सुरू होती. होंबाळे फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट प्रभासचे पुनरागमन असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळे त्याचे चाहते रिलीजची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. राष्ट्रीय सिने साखळीचा मर्यादित पाठिंबा असूनही चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग जबरदस्त झालं आहे. चित्रपटानं केवळ भारतातच ऑनलाइन बुकिंगमधून 42 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विक्रीचा विचार करता, 'सालार' ची एकूण ओपनिंग डे कमाई सर्व भाषांसह एकूण 100 कोटी ओलांडण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलुगू भाषिक राज्यातून 70 कोटी रुपयांच्या आसपासचे महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे. चित्रपटाच्या एकूण यशासाठी हिंदी मार्केट महत्त्वपूर्ण आहे आणि सुरुवातीच्या बुकिंग ट्रेंड अंदाजे 20 कोटी रुपयांच्या अपेक्षित कमाईचा आकडा दाखवत आहे.
-
37.16 K vs 15.66 K
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Friday release vs tomorrow release#Salaar vs #Dunki#Prabhas vs #ShahRukhKhan pic.twitter.com/rRprdI6wNc
">37.16 K vs 15.66 K
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 20, 2023
Friday release vs tomorrow release#Salaar vs #Dunki#Prabhas vs #ShahRukhKhan pic.twitter.com/rRprdI6wNc37.16 K vs 15.66 K
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 20, 2023
Friday release vs tomorrow release#Salaar vs #Dunki#Prabhas vs #ShahRukhKhan pic.twitter.com/rRprdI6wNc
केरळमध्ये शाहरुख खान स्टारर 'डंकी' आणि मोहनलाल स्टारर 'नेरू' या दोन चित्रपटांशी 'सालार' ला स्पर्धा करावी लागणार असतानाही 'सालार' ला यश मिळताना दिसतंय. हा चित्रपट मास-फ्रेंडली मानला गेला आहे आणि त्याची कर्नाटकात पहिल्या दिवशी अंदाजे कमाई सुमारे 12 कोटी रुपये इतकी असेल तर केरळमध्ये चार कोटीहून अधिक आणि तामिळनाडूमध्ये 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
-
Highest Opening Day Advance Booking Tickets For 2023 in India💥💥
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1. #LEO: 2.45 M
2. #Salaar: 2.24M
3. #Jawan: 1.58M
4. #Animal: 1.35M
5. #Pathaan: 1.08M
">Highest Opening Day Advance Booking Tickets For 2023 in India💥💥
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 22, 2023
1. #LEO: 2.45 M
2. #Salaar: 2.24M
3. #Jawan: 1.58M
4. #Animal: 1.35M
5. #Pathaan: 1.08MHighest Opening Day Advance Booking Tickets For 2023 in India💥💥
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 22, 2023
1. #LEO: 2.45 M
2. #Salaar: 2.24M
3. #Jawan: 1.58M
4. #Animal: 1.35M
5. #Pathaan: 1.08M
-
Highest Opening Day Advance Booking Gross Belongs To #Salaar Now (2023 India)💥💥💥
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Will share all data in the morning.☑️
">Highest Opening Day Advance Booking Gross Belongs To #Salaar Now (2023 India)💥💥💥
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 21, 2023
Will share all data in the morning.☑️Highest Opening Day Advance Booking Gross Belongs To #Salaar Now (2023 India)💥💥💥
— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) December 21, 2023
Will share all data in the morning.☑️
विशेष म्हणजे, शाहरुख खान स्टारर चित्रपटाशी होंबळे फिल्म्सच्या निर्मितीचा हा दुसरा सामना आहे. होंबाळे फिल्म्सचा 'केजीएफ'चा पहिला भाग आणि शाहरुख स्टारर 'झीरो' चित्रपटाची टक्कर झाली होती. 'सालार' चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगु भाषेत थिएटरमध्ये दाखल झाला आहे. प्रभासच्या साथीने 'सालार' मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, श्रृती हासन आणि बॉबी सिम्हा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा -