ETV Bharat / entertainment

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्या घरी हलला पाळणा; दिला जुळ्या मुलींना जन्म - रुबिना दिलैकनं दिला जुळ्या मुलींना जन्म

Rubina Dilaik Twin Baby Girl: टीव्ही स्टार रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला जुळ्या मुलींचे आई-वडील झाल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्रीच्या जिम ट्रेनरनं सोशल मीडियावर याचा खुलासा केला आहे. मात्र, काही वेळानंतर रुबिनाच्या ट्रेनरनं ही पोस्ट डिलीट केली.

Rubina Dilaik Twin Baby Girl
रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला यांच्या जुळ्या मुली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 4:19 PM IST

मुंबई - Rubina Dilaik Twin Baby Girl: टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला हे जुळ्या मुलींचे आई-वडील झाले आहेत. ही आनंदाची बातमी समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या जोडप्यानं त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. रुबिना आणि अभिनव आई-वडील झाल्याचा खुलासा अभिनेत्रीच्या जिम ट्रेनरनं केला होता. रुबिना दिलैकनं आई झाल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर वाऱ्याप्रमाणे पसरलं आहे. आता याबद्दल अनेक चर्चा होत असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहेत. 16 डिसेंबर 2023 रोजी रुबीनाच्या फॅन पेजनं एक पोस्ट शेअर केली होती.

रुबिना दिलैकनं दिला जुळ्या मुलींना जन्म : या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, रुबिना जुळ्या मुलींची आई झाली असल्याचं तिच्या जिम ट्रेनरनं खुलासा केला आहे. या फॅन पेजनं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताच लोकांमध्ये खळबळ उडाली. रुबिना आणि अभिनव यांनी अद्याप त्यांच्या जुळ्या मुलांच्या आगमनाची घोषणा केलेली नाही. रुबीनाच्या जिम ट्रेनरनं आता ही पोस्ट डिलीट केली आहे. रुबिना प्रेग्नेंसीच्या काळात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. सप्टेंबरमध्ये तिच्या गर्भधारणेची पुष्टी केल्यानंतर, तिनं नोव्हेंबरमध्ये खुलासा केला होता की ती जुळ्या मुलांची आई होणार आहे. गरोदरपणात होणाऱ्या बदलांसोबतच तिनं तिच्या बेबी बंपचा खुलासा सोशल मीडियावर अनेकदा केला आहे.

  • according to reports, Rubina Dilaik and Abhinav Shukla are celebrating the arrival of their adorable twin baby girls. #RubinaDilaik

    Congratulations to the happy couple on this joyous occasion! pic.twitter.com/0gTV5qxCow

    — THE NADDY🔥 (@Nady_asim1) December 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रुबिनाच्या ट्रेनरची पोस्ट : रुबिना दिलैकची ट्रेनर ज्योती पाटीलनं एक फोटो शेअर केली होती. या फोटोमध्ये रुबिना आणि ती पोझ देताना दिसत होत्या. रुबीनानं या फोटोमध्ये ओव्हरसाईज टी-शर्ट आणि काळा शॉर्ट्स घातलेला होता. याशिवाय तिनं यावर केस बनमध्ये बांधले होते.या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. या पोस्टमध्ये रुबिनाच्या ट्रेनरनं 'अभिनंदन' असं लिहिलं होतं. यापूर्वी रुबिनानं तिच्या प्रेगनेंसीबद्दल लपवून ठेवलं होतं, त्यानंतर बऱ्याचं दिवसांनी तिनं चाहत्यांना ही सुखद बातमी दिली होती. रुबिनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात तिचं बेबी बंप दिसत आहे. रुबिना आणि अभिनव शुक्ला यांचे 2018 रोजी लग्न झाल. लग्नानंतर दोघांनी बिग बॉसमध्ये एकत्र सहभाग घेतला होता.

हेही वाचा :

  1. पुष्पा फेम जगदीश प्रताप भंडारीला अटक, तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा केला कबूल
  2. तर श्रेयस तळपदेच्या तब्येतीत सुधार; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
  3. रामोजी फिल्म सिटीमध्ये हिवाळी उत्सव जोरात सुरू, पर्यटकांसाठी खास पॅकेजेस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.