ETV Bharat / entertainment

Hollywood Entry : राम चरण हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार ; 'आरआरआर' स्टारने दिला हा मोठा इशारा - राम चरण हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार

'आरआरआर' (RRR) यासारख्या आंतरराष्ट्रीय हिट चित्रपटाचा मुख्य अभिनेता, राम चरण आता हॉलिवूडमध्ये उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे. या अभिनेत्याने हॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा मोठा इशारा दिला आहे.

ram charan hollywood entry
राम चरण हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार
author img

By

Published : May 23, 2023, 12:34 PM IST

मुंबई: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार राम चरण हा सध्या यशाचा शिखरावर आहे. अभिनेत्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या 'आरआरआर' चित्रपटाचे यश हे जगभर गाजले. 'आरआरआर' हा चित्रपट ऑस्कर विजेता ठरला. तसेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींपेक्षा जास्त कमाई केला आहे. आता या चित्रपटाद्वारे राम चरण आंतरराष्ट्रीय स्टार बनले आहेत. आता तो हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असे दिसत आहे. कारण श्रीनगरमध्ये झालेल्या जी 20 (G20) शिखर परिषदेत राम चरण हा सहभागी झाला होता. चित्रपटांवर या ठिकाणी चर्चा झाली. दरम्यान, यावेळी अभिनेत्याने त्याच्या हॉलिवूड पदार्पणाबद्दल चाहत्यांना एक हिंट दिली आहे.

हॉलीवूडमध्ये झळणार राम चरण : राम चरम हे जी 20 ( G20) शिखर परिषदेत भारतीय चित्रपटसृष्टीतील उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तसेच यावेळी त्याने चाहत्यांना हॉलीवूडमधून ऑफर मिळण्याबद्दल एक मोठा इशारा दिला आहे. तो म्हणाला, 'मला माझा भारत देशाला जगभर प्रसिद्ध करायचा आहे, हे फक्त हॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शकाच्या मदतीने शक्य होईल, मला माझी संस्कृती सोडायची नाही, आपली संस्कृती आणि भारतीय भावना फार मजबूत आहेत. आमच्या कथांमध्ये प्रतिष्ठा आहे, ती केवळ दक्षिणेतील चित्रपटसृष्टीचीच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीची आहे.

'गेम चेंजर' चित्रपट : राम चरणच्या कामाबद्दल बोलायला गेले तर 'आरआरआर' या चित्रपटाने धमाकेदार कमाई केल्यानंतर आता राम चरण त्याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एस. शंकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र राम चरणसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. या चित्रपटात अंजली, एस.जे. सुर्या आणि जयराम हे मुख्य भूमिकेत पडद्यावर दिसेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. हा चित्रपटा राम चरण असल्यामुळे हा बॉक्स ऑफिसवर नक्कीच कमाल करेल असे दिसत आहे. कारण चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आल्यानंतर या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर फार चर्चा होतांना दिसत आहे.

हेही वाचा : Manoj Bajpayee on Sushant Singh : शुद्ध मनाच्या सुशांत सिंगला फिल्म इंडस्ट्रीतील हेराफेरी कळली नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.