ETV Bharat / entertainment

RARKPK Advance Booking : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद...

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' २८ जुलै २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला खूप जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रणवीर सिंग, आलिया भट अशी जबरदस्त जोडी, अनेक वर्षांनंतर करण जोहरचे दिग्दर्शन आणि विशेष म्हणजे धर्मेंद्र आणि जया बच्चन यांची अनेक वर्षांनंतर एकत्रित भूमिका अशी केमिस्ट्री व्यवस्थित जुळून आली तर हा चित्रपट दोनशे कोटींचा गल्ला जमवेल, असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे.

RARKPK Advance Booking
रॉकी और रानी की प्रेम कहानीची अ‍ॅडव्हान्स बुकिंग
author img

By

Published : Jul 27, 2023, 12:27 PM IST

मुंबई : करण जोहरचा दिग्दर्शित चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' २८ जुलै २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतले एके काळचे 'ही मॅन' धर्मेंद्र, 'गुड्डी' जया बच्चन यांना बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद अनुभव असणार आहे. शिवाय यात शबाना आजमी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या रोमँटिक फॅमिली ड्रामाच्या रिलीजला फक्त एक दिवस शिल्लक असताना, चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगही चांगली झाली आहे. मुसळधार पावसाचा तडाखा बसला नाही तर प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांमध्ये येण्याची शक्यता आहे.

आगाऊ बुकिंग : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी आगाऊ बुकिंग सोमवारी उघडले आणि बुधवार अखेरीस, चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी ३१,००० पेक्षा जास्त तिकिटे बुक झाली. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाची २६ जुलै २०२३ रात्री ११:५९ वाजेपर्यंत ३१,००० तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून एक दिवस बाकी असला तरी रणवीर-आलिया स्टारर चित्रपटाची आगाऊ ६० ते ७५ हजार तिकिटे विकली जातील, अशी अपेक्षा केली जात आहे.

अंदाजे कमाई : हे आकडे चित्रपटासाठी ११-१४ कोटी रु. ओपनिंग मिळवण्यासाठी पुरेसे असतील, असा मोठ्या चित्रपट ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे. आता सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे आकडे सुरुवातीसाठी चांगले आहेत. करण जोहरच्या दिग्दर्शित रणवीर आणि आलियासारख्या स्टार्सच्या चित्रपटाच्या ओपनिंगबद्दल जास्त अपेक्षा आहे. तसेच काही आठवडे कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याचा फायदा या चित्रपटाला नक्कीच होऊ शकतो.

चित्रपटाचे केले प्रमोशन : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटासाठी आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि करण जोहर खूप प्रमोशन केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट करण्यासाठी या चित्रपटामधील स्टार कास्ट वेगवेगळ्या शहरात चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. रणवीर सिंगला बऱ्याच काळापासून चांगला हिट चित्रपट मिळू शकलेला नाही. त्यामुळे त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाद्वारे करण जोहर ७ वर्षांनंतर दिग्दर्शनात परत आला आहे.

हेही वाचा :

  1. Ameesha Patel :अमिषा पटेलला कोर्टाने ठोठावला ५०० रुपयांचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण...
  2. Parineeti chopra and Raghav chadha : परिणीती चोप्राच्या होणाऱ्या नवऱ्यावर कावळ्याचा हल्ला, राघव चड्ढा ट्रोल
  3. Kam Chalu Hai! : राजपाल यादवचे सांगलीत 'काम चालू है!', मग क्रिकेटर स्मृती मंधानाचे काय डेटिंग चालू आहे?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.