ETV Bharat / entertainment

Rihanna expecting second child : गायिका रिहाना दुसऱ्यांदा गर्भवती, सुपर बाउल 57 मध्ये परफॉर्मन्सनंतर झाला खुलासा - रिहानाचे बेबी बंप फोटोशूट गाजले होते

सुपर बाउल 57 या अमेरिकन फॅटबॉल चँपियनशीपच्या सामन्याच्या हाफटाइम शोमध्ये गायिका रिहानाने 13 मिनिटांचा परफॉर्मन्स दिला. यानंतर रिहाना दुसऱ्या मुलासाठी गर्भवती असल्याची पुष्टी झाल्याने तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गायिका रिहाना दुसऱ्यांदा गर्भवती
गायिका रिहाना दुसऱ्यांदा गर्भवती
author img

By

Published : Feb 13, 2023, 12:49 PM IST

वॉशिंग्टन - ग्रॅमी पुरस्कार विजेती पॉप स्टार रिहाना रविवारी ५७ व्या चँपियनशीपच्या सुपर बाउल फुटबॉल सामन्यांच्या वेळी मैदानावर हजर होते. सामन्याच्या हाफ टाईमध्ये विशेष अतिथी म्हणून दिसली. यावेळी यावेळी गायिका रिहाना गर्भवती असल्याची गुड न्यूज तिच्या बेबी बंपमुळे चाहत्यांना मिळाली. वृत्तानुसार, रविवारी गायिकेच्या प्रतिनिधीने तिच्या अतिप्रतीक्षित सुपर बाउल LVII हाफटाइम शोच्या आधी बातमीची पुष्टी केली.

लाल रंगाचा पोशाख परिधान केलेली डायमंड्स गायिका प्रेक्षकांसमोर तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. यासह रिहाना हाफटाइम शोमध्ये भूमिका करणारी पहिली गर्भवती महिला बनली आहे. तिच्या परफॉर्मन्सच्या अगोदर, ग्रॅमी विजेत्या अभिनेत्रीने सांगितले की तिने प्रथम सुपर बाउलमध्ये परफॉर्म करण्याचा दोनदा विचार केला होता, परंतु मातृत्वाने तिला शेवटी मोठ्या खेळात परफॉर्मन्स करण्यास प्रेरित केले.

ग्रॅमी विजेती गायिका रिहाना आणि तिचा प्रियकर, रॅपर A$AP रॉकी यांनी मे 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये, एका स्रोताने पीपल मासिकाला पुष्टी दिली की रिहाना आणि रॉकी अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर डेटिंग करत होते. जानेवारी 2020 मध्ये रिहानाचा तीन वर्षांचा प्रियकर, अब्जाधीश हसन जमीलपासून विभक्त झाल्यापासून या जोडप्याच्या रोमान्सच्या अफवा पसरवल्या होत्या.

रिहानाचे बेबी बंप फोटोशूट गाजले होते - २०२२ मध्ये ती जेव्हा पहिल्यांदा गर्भवती राहिली होती तेव्हा बार्बाडियन गायिका-अभिनेत्री रिहानाने एका मासिकाच्या मुखपृष्ठावर तिच्या पूर्ण वाढ झालेल्या बेबी बंपसह झळकत इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होती. मॅटर्निटी फॅशनची पुन्हा व्याख्या बनवत रिहानाने सोशल मीडियावर बेबी बंपचे आकर्षक फोटो शेअर केले होते. आई होण्यासाठी सज्ज झालेल्या रिहानाने असे कपडे वापरण्याची संधी परत परत येत नसल्याने फोटो शूट केले होते. एका मुलाखतीत, रिहानाने सांगितले की जेव्हा तिला तिच्या गरोदरपणाबद्दल कळले तेव्हा तिने मॅटर्निटी शॉपमधून कपडे खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता.

शेतकरी आंदोलनाला दिला होता गायिका रिहानाने पाठिंबा - भारतात २०२० आणि २०२१ मध्ये शेतकऱ्यांचे उग्र ऐतिहासिक आंदोलन पार पडले. सुमारे ३७८ चाललेल्या या आंदोलनाला जगभरातील अनेक सेलेब्रिटींनी पाठिंबा दिला होता. यामध्ये अमेरिकन पॉप स्टार गायिका रिहानानेही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रिहानाने ट्विटमध्ये म्हटलंय की, आम्ही शेतकर्‍यांबद्दल का बोलत नाही. # फार्मर्सप्रोटेस्ट. तिच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली होती.

यापूर्वी रिहानाने मार्च 2020 मध्ये कुटुंब नियोजनाविषयी खुलासा केला होता. एका मॅगझिनशी बोलताना ती म्हणाली होती कीतिला आयुष्य खरोखरच लहान आहे हे जाणवत आहे आणि जगण्याचा एक नवीन मूर्खपणाचा दृष्टीकोन सापडला आहे. (एजन्सी इनपुटसह)

हेही वाचा - Zeenat Aman On Instagram: झीनत अमानचे इंस्टाग्रामवर पदार्पण, चाहत्यांनी केले स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.