ETV Bharat / entertainment

Rashmika Mandanna Animal first look : रणबीरच्या अ‍ॅनिमलमधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, भेटा गीतांजलीला - भेटा गीतांजलीला

Rashmika Mandanna Animal first look : आगामी गँगस्टर ड्रामा अ‍ॅनिमलमधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आलाय. यात ती गीतांजली ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. संदिप वंगा रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.

Rashmika Mandanna Animal first look
रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 5:04 PM IST

मुंबई - Rashmika Mandanna Animal first look आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट अ‍ॅनिमलच्या निर्मात्यांनी शनिवारी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या फर्स्ट लूक पोस्टरचं लॉन्चिंग केलंय. या पूर्वी या गँगस्टर ड्रामा चित्रपटामधील रणबीर कपूर आणि अनिल कपूरच्या फर्स्ट लूक पोस्टर्सचे लॉन्चिंग झालं होतं. आता रश्मिकाचा या चित्रपटातील फर्स्ट लूक दाखवण्यात आलाय.

टी सिरीजच्या वतीन सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये रश्मिका कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र केलेली दिसत आहे. तिनं मरून आणि क्रीम कलरची साडी नेसलेली दिसतेय. या पोस्टला कॅप्शन देताना लिहिलंय, 'गीतांजलीच्या भूमिकेत रश्मिका मंदाना!'

गुरुवारी अ‍ॅनिमल चित्रपटाच्या टीमने अनिल कपूरचे एक आकर्षक फर्स्ट लूक पोस्टर टाकलं होतं. पोस्टरमध्ये अनिल छातीवर पट्टी बांधून खुर्चीवर बसलेला दिसतोय तर त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त काही तरी षडयंत्र रचतोय असं वाटतंय. यात तो बलबीर सिंगची भूमिका साकारणार आहे.

आधी ठरल्याप्रमाणे अ‍ॅनिमल चित्रपटाचा टीझर 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रणबीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या तारखेला अ‍ॅनिमल टीझर रिलीज केला जाईल. यापूर्वी हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी पडद्यावर येणार होता. मात्रगदर 2 आणि ओएमजी 2 सोबत बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टाळण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 1 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

काही दिवसापूर्वी अ‍ॅनिमल चित्रपटाचा प्री ठीझर लॉन्च रण्यात आला होता. यात रणबीर कपूरची झलक पाहायला मिळाली होती. यात तो लुंगीसह पाढरा शर्ट परिधान केलेला दिसतो. डोईवर त्याच्या मुखवटा आहे. हातात कुऱ्हाड घेऊन तो हल्ला करणाऱ्या शत्रूंवर तुटून पडताना दिसतो. या चित्रपटासाठी रणबीरने आपल्या बॉडीमध्ये मोठे बदल केले आहेत. यासाठी त्याने सेलेब्रिटी जिम ट्रेनर शिवमसोबत भरपूर घाम गाळलाय. यामुळे त्याचे शरीर सौष्ठव अधिक मजबूत झाल्याचं दिसतंय. याचा परिणाम आपल्याला या टीझरमधील त्याच्या आक्रमक अवतारात दिसतोय. यापूर्वी रिलीज झालेला त्याचा फर्स्ट लूकही खूप आकर्षक होता. रणबीरच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट बहुप्रतीक्षित आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत.

हेही वाचा -

१. Anil Kapoor Animal first look : 'अ‍ॅनिमल का बाप बलबीर सिंग'... अनिल कपूरचा 'अ‍ॅनिमल' फर्स्ट लूक

२. The Great Indian Family box office: विकी कौशलची जादु चालली नाही, द ग्रेट इंडियन फॅमिलीची खराब सुरुवात

३. Ishaan Khatter date with Chandni : गर्लफ्रेंड चांदनी बेंझसोबत डेट करताना दिसला इशान खट्टर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.