ETV Bharat / entertainment

Cannes 2022 : रणवीर सिंग कान्समध्ये दाखल, दीपिका पदुकोणसह शेअर केले फोटो - कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022

दीपिका पदुकोणचा अष्टपैलू पती अभिनेता रणवीर सिंग अखेर 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022'मध्ये दाखल झाला आहे. कान्समधील या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

रणवीर सिंग कान्समध्ये दाखल
रणवीर सिंग कान्समध्ये दाखल
author img

By

Published : May 23, 2022, 2:37 PM IST

मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022'मध्ये तिची चमक दाखवत आहे. दीपिका पदुकोण येथे ज्युरी सदस्य म्हणून सामील झाली आहे. भारतीय सेलिब्रिटी कान्स ज्युरी सदस्यात सामील झाले आहे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे. दीपिका गेल्या सहा दिवसांपासून येथे आहे आणि आता तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगही येथे पोहोचला आहे. कान्समधून समोर आलेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

फॅन पेजने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका कूल लूकमध्ये दिसत आहेत. फोटोंमध्ये रणवीर-दीपिका हसताना आणि मस्ती करताना दिसत आहेत.

रणवीर सिंग कान्समध्ये दाखल
रणवीर सिंग कान्समध्ये दाखल

या फोटोंमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत फिल्ममेकर आणि अभिनेत्री रेबेका हॉलही दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 दीपिका पदुकोणने आपल्या वेगळ्या लूकने गर्दी जमवण्याचे काम केले आहे.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022' 28 मे पर्यंत चालणार आहे. भारतातून 11 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ येथे पोहोचले होते. येथून साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे, तमन्ना भाटिया आणि ऐश्वर्या राय मायदेशी परतल्या आहेत.

दुसरीकडे, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्याचा नुकताच 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. दीपिका पदुकोण अभिनेता हृतिक रोशनसोबत 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर दीपिका बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 2' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.