मुंबई - बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी जोडप्यांपैकी एक रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. चाहते आता ते पालक होण्याची वाट पाहत आहेत. कारण, बॉलीवूड आणि टीव्ही स्टार्सचे पालक बनल्याच्या बातम्या रोज येत आहेत. अशा परिस्थितीत या जोडीची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे, जे लवकरच या जोडप्याच्या घरातून आनंदाची बातमी ऐकण्यास उत्सुक आहेत. पण दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. आता एका मुलाखतीत रणवीर सिंगने बेबी प्लॅनिंगबाबत मोठा खुलासा केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जयेशभाई जोरदार' अभिनेता रणवीर सिंगने एका मुलाखतीत बेबी प्लॅनिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत जेव्हा रणवीर सिंगला मुलाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा रणवीरने सांगितले की तो आणि दीपिका भविष्याचे नियोजन करण्यासाठी आणि इतर गोष्टींबद्दल बोलत आहेत. त्याने सांगितले की त्यांचे वैवाहिक जीवन उत्तम सुरू असून आता वेळ येऊन ठेपली आहे. शिवाय करियरही योग्य मार्गावरुन जात आहे.
रणवीर सिंगने मुलाखतीत सांगितले की, ''माझे आयुष्य चांगले चालले आहे, माझे करिअरही योग्य दिशेने सुरू आहे, मला वाटते की लग्नाला आता तीन ते चार वर्षे झाली आहेत, (मी आणि दीपिका) आम्ही नेहमी बोलतो. आयुष्यबाबत सर्व काही आपापसात शेअर करतो आणि आयुष्याला मार्ग कसा द्यायचा यावर आपण बोलतो, त्यामुळे खरं तर आपण यावरही चर्चा करत असतो. आम्ही नेहमी पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि आयुष्याबद्दल बोलतो.''
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी (10 मे) अभिनेत्याच्या आगामी 'सर्कस' या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. इकडे दीपिका पदुकोण अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपिका शेवटची 'गहेरियां' चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा -हॉट तेजस्वी प्रकाशच्या स्टाईलने केला इन्स्टाग्रामवर तुफान कब्जा पाहा फोटो