ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंना दीपिकाने परवानगी दिली होती का? नेटिझन्सचा सवाल - दीपिकाने परवानगी दिली होती का

पेपर मॅगझिनवरील रणवीर सिंगच्या न्यूड फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. या फोटोशूटला दीपिकाने परवानगी कशी दिली याबद्दल नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तर काहीजण परवानगी दिल्याबद्दल दीपिकाचे कौतुकही करीत आहेत.

रणवीर सिंग न्यूड फोटो शूटमधील एक फोटो
रणवीर सिंग न्यूड फोटो शूटमधील एक फोटो
author img

By

Published : Jul 22, 2022, 12:45 PM IST

मुंबई - रणवीर सिंगची अलिकडे बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी झाली असली, तरी तो कधीही बातम्या बनवण्यात अपयशी ठरत नाही. बेयर ग्रीलसोबतच्या जंगलातील त्याच्या साहसांपासून ते शाहरुख खानच्या मन्नतच्या शेजारी 119 कोटी रुपयांची हवेली खरेदी करण्यापर्यंत, रणवीर नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

एका मॅगझिन कव्हरवरील फोटोसाठी रणवीर सिंगने नग्न फोटोशूट केल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. पेपर मॅगझिनच्या नव्या अंकासाठी हे फोटोशूट त्याने केले आहे. यात त्याने बोल्ड फोटोंसाठी पोझ दिल्या असून अनेकजण त्याच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

रणवीर सिंग न्यूड फोटो शूटमधील एक फोटो
रणवीर सिंग न्यूड फोटो शूटमधील एक फोटो

त्याच्या या पोटोशूट नंतर इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. असंख्य मीम्स बनत असून अनेकांनी त्याच्या फोटोंची खिल्लीही उडवली आहे. हे फोटोशूट करण्यासाठी दीपिका पदुकोणने परवानगी कशी दिली याबद्दल नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

एका चाहत्याने दीपिकाला फोटो ठीक आहे का असे विचारले आहे. तर एकाने "वाह..त्याच्या पत्नीने त्याला परवानगी दिली?!" असो प्रश्न रणवीरला विचारला आहे.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

'डाइट सब्या' नावाच्या एका अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने हे फोटो पोस्ट केले आहेत. रणवीर सिंगने या पेपर मॅगझिनच्या माध्यामातून बर्ट रेनॉल्ड्सला श्रद्धांजली म्हणून इंटरनेट ब्रेक केल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट आणि फॅशनबद्दलही सांगितले. जेव्हापासून हे फोटो बाहेर आले तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या आनंददायी प्रतिक्रिया आहेत, तर काहींच्या मिश्कील व्यंगात्मक प्रतिक्रिया आहेत.

रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्यासोबत रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या चित्रपटात तो दिसणार आहे. हा चित्रपट 2022 च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे. रणवीरकडे करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासोबतचा चित्रपट आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या पडद्यावर येणार होता, परंतु आता आलियाच्या गरोदरपणामुळे उशीर होणार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा - रणवीर सिंगच्या नग्न फोटोशूटने इंटरनेटवर भूकंप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.