ETV Bharat / entertainment

बार्सिलोना फुटबॉल सामन्यादरम्यान डिस्प्लेवर झळकले 'अ‍ॅनिमल'चे पोस्टर्स - Poster of Animal in football match

Poster of Animal in football match : अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे पोस्टर्स हे बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यादरम्यान एलईडी ओओएच डिस्प्लेवर दिसले. यानंतर या चित्रपटाचे निर्माते प्रचंड आनंदीत झाले आहेत.

Poster of Animal in football match
फुटबॉल सामन्यातील अ‍ॅनिमलचे पोस्टर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 12:59 PM IST

मुंबई - Poster of Animal in football match : अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'अ‍ॅनिमल' जगभरात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट जगभरात पसंत केला जात आहे. 'अ‍ॅनिमल'मध्ये दिसणारी स्टारकास्ट जगभरात सध्या प्रसिद्ध होत आहे. दरम्यान 'अ‍ॅनिमल'बाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात 'अ‍ॅनिमल'चे पोस्टर्स झळकले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात जाहीरात करणारा 'अ‍ॅनिमल' हा भारतीय चित्रपट उद्योगातील पहिला चित्रपट ठरला आहे. स्टेडियमच्या एलईडी ओओएच (LED OOH) डिस्प्लेवर 'अ‍ॅनिमल'चं पोस्टर दिसलं.

'अ‍ॅनिमल'चं पोस्टर फुटबॉल सामन्या दरम्यान झाले डिस्प्ले : स्टेडियममध्ये लागलेल्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाचा रोमँटिक सीन्स पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये 'अ‍ॅनिमल'चं पोस्टर स्टेडियम डिस्प्लेवर दिसत आहे. आता या बातमीमुळं 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी आपला आनंद व्यक्त केला. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट रिलीजच्या 13व्या दिवसात आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 450 कोटींहून अधिक आणि जगभरात 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटबद्दल : अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग यासारख्या दमदार चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे बजेट 100 कोटींच्या आसपास आहे. एका चित्रपटासाठी 60 ते 70 कोटी रुपये फी आकारणाऱ्या रणबीर कपूरनं या चित्रपटाच्या बजेटचा विचार करता केवळ 35 कोटी रुपये फी घेतली आहे. 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर तृप्ती दिमरी, सौरभ शुक्ला, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा , सुरेश ओबेरॉय आणि इतर कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. 'अ‍ॅनिमल'नं अनेक चित्रपटांचं विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट लवकरच 1000 कोटीची कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

  1. एमी-विजेता अभिनेता आंद्रे ब्राउगर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन
  2. 'बिग बॉस 17'मध्ये मुनावर फारुकीची स्टँड-अप कॉमेडी, स्पर्धकांना पटवण्यात दाखवली हुशारी
  3. ऑस्कर विजेती गुनीत मोंगाने पती सनी कपूरसोबत साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.