ETV Bharat / entertainment

Animal New Release Date: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची नवीन रिलीज तारीख जाहीर - कधी प्रदर्शित होणार अ‍ॅनिमल

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट अ‍ॅनिमलला नवीन रिलीज डेट देण्यात आली आहे. जाणून घ्या हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार आणि बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटासोबत टक्कर देणार?

Animal New Release Date
अ‍ॅनिमल या चित्रपटाची नवीन तारीख घोषीत
author img

By

Published : Jul 3, 2023, 4:45 PM IST

मुंबई : रणबीर कपूर, आणि रश्मिका मंदान्ना स्टारर अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'अ‍ॅनिमल' बाबत निर्मात्यांमध्ये संभ्रम होत आहे. 2 जुलै रोजी 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट यापूर्वी 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार होता. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी कोणताही धोका न पत्करता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आणि आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'अ‍ॅनिमल'ला नवीन रिलीज डेट मिळाली आहे. या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील दिसणार आहे.

आता अ‍ॅनिमल कधी प्रदर्शित होणार ? : अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी आता या चित्रपटाशी कोणताही खेळ न करता चित्रपटाची रिलीज डेट 1 डिसेंबर 2023 अशी केली आहे. हा चित्रपट आता हिवाळ्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, अ‍ॅनिमल चित्रपटाची समस्या अद्याप संपलेली नाही, कारण 1 डिसेंबर 2023 रोजी एक मोठा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. रणबीरच्या या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर कधी प्रदर्शित होणार यासाठी प्रेक्षक फार आतुरेने वाट पाहत होते. मात्र चित्रपटाच्या रिलीज डेटमुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे.

अ‍ॅनिमल आता कुठल्या चित्रपटाशी स्पर्धा करणार : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी तयार झाला असता, तर बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' आणि अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2'सोबत या चित्रपटाची टक्कर झाली असती, परंतु आता हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी बॉलिवूडमध्ये धडकणार आहे. विक्की कौशलचा सॅम बहादूर चित्रपट आणि रणबीरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे. हे दोन्ही चित्रपट आता एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे कुठला चित्रपट किती कमाई करेल हे बघणे लक्षणीय ठरणार आहे. दोन्ही चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार असल्यामुळे कुठल्या कलाकाराला जास्त प्रेम मिळेल हे येणाऱ्या काळातच समजेल.

हेही वाचा :

  1. ZHZB collection day 30 : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कमाईच्याबाबतीत मागे पडला
  2. Malavika Mohanan pictures : मालविका मोहननने मदुराईमधील थंगालनच्या सेटवरून शेअर केले विहंगम फोटो
  3. ZHZB collection day 30 : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कमाईच्याबाबतीत मागे पडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.