मुंबई - बॉलिवूड स्टार जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काल २२ जून रोजी दुबईला सुट्टीसाठी मुलगी राहासह रवाना झाल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती. विमानतळावर जोडप्याला पापाराझींना गाठले होते. मुलीसह क्वालिटी टाइम घालवण्यासाठी जात असलेल्या आलिया आणि रणबीरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. अलिकडे एनिलमल चित्रपटासाठी रणबीरने दाढी वाढवली होती. या अगोदर तो जेव्हाही दिसला होता त्यात तो दाढीत दिसला होता. पण सुट्टीला पत्नीसह जाताना रणबीरने क्लिन शेव करणे पसंत केले होते.
आता दुबईत सुट्टीवर पोहोचल्यावर रणबीर आणि आलियाचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर झळकला आहे. या फोटोमध्ये रणबीर आणि आलिया सुंदर काळ्या पोशाखात दिसत आहेत. या फोटोमध्ये रणबीर आणि आलिया यांच्यामध्ये उभी असलेली व्यक्ती त्याची फॅन आहे. या चाहत्याने या जोडप्यासोबतचा एक फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. आता रणबीर आलियाचा डेट नाईटचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रणबीर कपूरचे एक फॅन पेज इकडून तिकडे हा फोटो व्हायरल करत आहे. रणबीर आलियाच्या व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये हे जोडपे काळ्या रंगाच्या मॅचिंग कपड्यांमध्ये दिसत असून ते एका लक्झरी फूड शॉपमध्ये उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर चाहते आता भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आलियाच्या एका चाहत्याने तिच्या या व्हायरल फोटोवर तिच्या लूकवर लिहिले आहे की, 'तू खूपच सुंदर दिसत आहेस'. रणबीर-आलियाच्या आणकी काही चाहत्यांनी दोघांचेही भरभरुन कौतुक केले आहे. ते मुलीसोबत एकत्र वेळ घालवत असल्याबद्दल व धक्काधक्कीच्या कामातून त्यांनी वेळ काढल्याबद्दल त्यांची प्रशंसाही केली जात आहे.
रणबीर-आलियाचा वर्क फ्रंट - आलिया नुकतीच ब्राझीलहून परतली आहे. आलिया तिच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी ब्राझीलमधील साओ पाउलो येथे पोहोचली होती. ब्राझीलमधील टुडुम ( TUDUM ) कार्यक्रमात सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट द आर्चीजसह अनेक चित्रपटांचे ट्रेलर लाँच करण्यात आले. दुसरीकडे, रणबीर कपूरच्या कामाबद्दल सांगायचे तर, त्याने नुकतेच एनिमल या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आलिया आणि रणबीर या दोघांचा हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.