ETV Bharat / entertainment

shooting of Pushpa 2 and Salaar : 'पुष्पा 2', 'सालार' चित्रपटांच्या शूटिंगमुळे रामोजी फिल्मसिटी गजबजली

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 5:27 PM IST

अनेक भाषेतील शुटिंगमुळे नेहमी गजबजलेल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सध्या 'पुष्पा 2' आणि 'सालार' या पॅन इंडिया चित्रपटांचं शुटिंग सुरू आहे. 'पुष्पा 2' च्या एका गाण्याचं शुटिंग होत असून या भव्य गाण्यात सुमारे एक हजार नर्तक आहेत. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य करत आहेत.

shooting of Pushpa 2 and  Salaar
रामोजी फिल्मसिटी गजबजली

हैदराबाद - तेलंगणाची राजधान असलेल्या हैदराबाद शहतात बिग बजेट चित्रपटांची निर्मिती सातत्यानं सुरू असते. हैदराबादमधील प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी आजकाल प्रदीर्घ चित्रपटांच्या शूटिंगमुळे नेहमी गजबजलेली असते. सध्या अनेक तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटांची निर्मिती सुरू असताना अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाचा पॅन इंडिया चित्रपट रिमेक 'पुष्पा 2' आणि प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या पॅन इंडिया 'सालार'चे शुटिंगही रामोजी फिल्म सिटीत सुरू आहे.

पुष्पा 2: द रुल चित्रपटाचे निर्माते चित्रपटातील जत्रेच्या पार्श्वभूमीवर एका गाण्याच्या शूटिंगमध्ये गुंतले आहेत. या भव्य गाण्यात सुमारे एक हजार नर्तक आहेत. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य करत आहेत. या गाण्याव्यतिरिक्त रामोजी फिल्म सिटीमध्ये महिनाभराच्या शेड्यूलमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचे फाईट सीन आणि चित्रपटातील काही प्रमुख दृश्ये देखील शूट केले जातील. 'पुष्पा 2' मधील बरेचसे शुटिंग जंगलाच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे फिल्म सिटीत त्या प्रकारचे जंगलातील मातीचे वळणदार रस्ते व इतर लोकेशन्स तयार करण्यात आली आहेत. यासाठी चित्रपटाची तांत्रीक टीम, स्टंटमन्स व इतर कर्मचारी मेहनत घेताहेत. हा चित्रपट भव्य होण्यासाठी संपूर्ण टीमने कोणतीही कसर सुटू नये याची पूर्ण काळजी घेतलीय.

'पुष्पा २ द रुल' हा चित्रपट सुकुमार दिग्दर्शित करत असून २०२१ मध्ये आलेल्या पुष्पाचा हा सिक्वेल आहे. मैत्री मुव्हीज मेकर्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे संगीत देवीश्रीप्रसाद यांनी दिले आहे. 'सालार' हा प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. हा चित्रपट प्रशांत नील दिग्दर्शित करत असून सध्या हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरू आहे.

'सालार'चे निर्माते एक खास गाणे शूट करत आहेत ज्यामध्ये सिमरत कौर मुख्य भूमिकेत आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राजू सुंदरम मास्टर करत आहेत. होंबळे फिल्म्स निर्मित या चित्रपटात श्रुती हासन मुख्य भूमिकेत आहे आणि पृथ्वीराज खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

1. Pankaj Tripathi Kadak Singh Look: पंकज त्रिपाठीचा 'कडक सिंग' फर्स्ट लूक प्रदर्शित

2. Bb 17 Promo : सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये कतरिना कैफ 'टायगर 3'चं करणार प्रमोशन

3. Warrant Against Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.