ETV Bharat / entertainment

Stree and Bhediya Sequels : राजकुमार राव, श्रद्धा कपूरची हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' या तारखेला होणार रिलीज - स्त्री 2 हॉरर कॉमेडी सिक्वलच्या रिलीजची तारीख

स्त्री या गाजलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री' 2018 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यातील कथानकाने व पात्रांनी सिनेमा संस्मरणीय बनवला होता. स्त्री २ चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

Etv Bharat
हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' या तारखेला होणार रिलीज
author img

By

Published : Apr 13, 2023, 11:13 AM IST

मुंबई - आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री 2 च्या निर्मात्यांनी बुधवारी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात त्यांच्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. या प्रसंगी अभिनेता राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. स्त्री 2 हॉरर कॉमेडी सिक्वलच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यासाठी एक स्किट तयार केले होते. 'स्त्री 2' हा चित्रपट 31 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री' 2018 साली प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे सिनेमा ब्लॉकबस्टर हिट झाला होता.

भेडिया चित्रपटाचाही सिक्वेल येणार - गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या वरुण धवनच्या 'भेडिया' या हॉरर कॉमेडी चित्रपटात राजकुमार आणि अपारशक्ती यांचाही एक कॅमिओ होता. 'भेडिया'च्या निर्मात्यांनीही या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. यासाठी आयोजित सोहळ्यात वरुणने भेडिया 2 च्या लोगोचे लॉन्चिंग केले आणि त्याचा उत्साह व्यक्त करत लांडग्याचा आवाजही काढला. भेडिया हा चित्रपट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला. वरुण धवन एका वेगळ्या अवतारात या चित्रपटात दिसला होता.

'स्त्री'च्या सिक्वेलबद्दल - तत्पूर्वी, अभिषेक बॅनर्जी यांनी स्त्रीच्या बहुप्रतिक्षित सिक्वेलबद्दलही बोलले आणि म्हणाले, '२०२३ आले आहे!!! आणि या वर्षी किकस्टार्ट करण्यासाठी मी खूप रोमांचित आहे, परंतु मी गेल्या वर्षी केलेल्या कामाकडे मागे वळून पाहताना- मला खूप आनंद झाला. जेडी उर्फ जना बद्दल काळजीत होतो. पण कृतज्ञतापूर्वक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता स्त्री 2 चा प्रवास खूप रोमांचक असेल.. अलीकडेच मी अपूर्वाचे शुटिंग पूर्ण केले आहे. अत्यंत टोकाच्या पात्रांवर लोक काय प्रतिक्रिया देतील हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या वर्षी खेळाचे मैदान मोठे आणि चांगले असणार आहे... त्यामुळे मी त्याची वाट पाहत आहे.'

दरम्यान, राजकुमार आगामी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे.

हेही वाचा - Mika Singh In Doha : मिका सिंगने पंतप्रधान मोदींना केले सॅल्यूट; कारण घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.