ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra Choora Ceremony : प्रियांका चोप्राची आई मधू यांनी परिणीतीच्या चुडा सेरेमनीचे फोटो केले शेअर - परिणीती चोप्राची चुडा सेरेमनी

Parineeti Chopra Choora ceremony: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या शाही लग्नानंतर एकापाठोपाठ एक फोटो व्हायरल होत आहेत. अलीकडेच प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रानं परिणीतीच्या चुडा सेरेमनीमधील एक फोटो शेअर केला आहे.

Parineeti Chopra Choora ceremony
परिणीती चोप्राची चुडा सेरेमनी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 3:05 PM IST

Parineeti Chopra Choora ceremony : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता परिणीतीच्या चुडा सेरेमनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चुडा सेरेमनीमध्ये ती नाचताना दिसत आहे. अलीकडेच प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रानं परिणीती चोप्राच्या चुडा सेरेमनीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. फोटो शेअर करत मधु चोप्रा यांनी लिहलं, 'चुडा समारंभातील सर्वात आनंदी वधू', मात्र मधु चोप्रा यांनी काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट केली आहे.

परिणीतीचा चुडा समारंभ : व्हायरल झालेल्या परिणीतीच्या चुडा समारंभाच्या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. परिणीतीनं डोक्यावर रंगीबेरंगी चुनरी आणि हातात कलिरे घातलेले आहेत. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. फोटोमध्ये परी ही गुलाबी रंगाच्या कपड्यानं झाकलेले कलिरे आणि बांगड्या दाखवून कॅमेऱ्यासमोर हसत हसत पोज देताना दिसत आहे. 24 सप्टेंबर रोजी परिणीती चोप्रानं आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये लग्न केले. या दोघांनीही कुटुंबीय, नातेवाईक आणि खास मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. लग्नाच्या एका दिवसानंतर या जोडप्यानं त्यांच्या लग्नाची खास झलक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली. या जोडप्यानं 29 सप्टेंबर रोजी लग्नाचा एक व्हिडिओ शेअर करून सर्वांची मने जिंकली. या व्हिडिओवर अनेकजणांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

परिणीती आणि राघव यांचं लग्न : यापूर्वी परिणीती आणि राघवच्या हळदी समारंभाचे काही फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये परीनं लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. याआधी परिणीतीच्या उदयपूर रिसेप्शनचे फोटोही समोर आले होते. ज्यामध्ये तिनं गुलाबी रंगाची चमकदार साडी घातली होती. तिचा हा फोटो सानिया मिर्झानं शेअर केला होता. परिणीती चोप्रानं लग्नात मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेला सुंदर लेहेंगा परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या लग्नामध्ये परिणीतीची चुलत बहिण प्रियांका ही व्यस्त असल्यामुळे येऊ शकली नाही, असं काही दिवसापूर्वी मधु चोप्रा यांनी सांगितलं होत.

हेही वाचा :

  1. Priyanka chopra And Nick Jonas : निक जोनास प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर शेअर केली खास फोटो आणि व्हिडिओ...
  2. Actress Archana Gautam : अभिनेत्री अर्चना गौतमची काँग्रेसमधून हकालपट्टी, जाणून घ्या कारण
  3. Sushant Singh News :'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'ला सात वर्षे पूर्ण, दिशा पटानी सुशांतची आठवण काढत केली पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.