मुंबई - प्रियांका चोप्रा ही देशातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत तिने जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि हॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये आशियाई कलाकारांचे प्रतिनिधीत्व केले ते इतरांना आजवर शक्य झाले नव्हते. आजवरच्या तिच्या सर्वोच्च कामगिरीवर एक नजर टाकूयात.
1. प्रियंका चोप्रा फोर्ब्स कव्हरवर सर्वात प्रभावशाली १०० मध्ये असणारी पहिली भारतीय महिला बनली.
प्रियांका गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन उद्योगाचा एक भाग आहे आणि तिने आपल्या हिंमतीवर हे स्थान निर्माण केले आहे.
तिच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे तिने 'फोर्ब्स'च्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला होती. आणि फक्त एकदाच नाही तर दोनदा प्रियांकाला या यादीत स्थान मिळाले.
2. प्रियंका Vogue US च्या मुखपृष्ठावर येणारी पहिली दक्षिण आशियाई बनली
2018 मध्ये, प्रियांका 'व्होग अमेरिका' च्या मुखपृष्ठावर दिसणारी पहिली दक्षिण आशियाई बनली. 'व्होग इंडिया'च्या मुखपृष्ठावर अनेक वेळा आल्यानंतर, प्रियांका मासिकाच्या यूएस आवृत्तीचे मुखपृष्ठ मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
3. प्रियंका मॅराकेच फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित होणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली.
प्रियांकाला 2019 मध्ये मोरोक्को येथील फेस्टिव्हल इंटरनॅशनल डू फिल्म डी मॅराकेचमध्ये पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात तिला हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट रेडफोर्ड सोबत सन्मानित करण्यात आले.
4. जेव्हा ती टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये राजदूत म्हणून काम करणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अॅम्बेसेडर म्हणून निवडली जाणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरल्यानंतर प्रियांकाने बॉलीवूडला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणले. 2020 मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या 45 व्या आवृत्तीसाठी तिला आमंत्रित करण्यात आले होते.
5. जेव्हा प्रियंका बाल हक्कांसाठी जागतिक युनिसेफ सदिच्छा दूत बनली
2016 मध्ये, तिला बाल हक्कांसाठी जागतिक युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून घोषित करण्यात आले. ग्लोबल अॅम्बेसेडरच्या भूमिकेत सामील होण्यापूर्वी ती 10 वर्षे संस्थेची राष्ट्रीय राजदूत होती.
6. टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पीपल्स चॉईस अवॉर्ड जिंकणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री बनली.
तिच्या सहज अभिनयासाठी जगभरात ओळखल्या जाणार्या, प्रियांकाने 'नवीन टीव्ही मालिकेतील आवडती अभिनेत्री' या श्रेणीतील 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' जिंकून यूएसमध्ये अव्वल स्थान पटकावले. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. यूएस थ्रिलर 'क्वांटिको' मधील भूमिकेसाठी प्रियांकाला हा पुरस्कार मिळाला.
7. प्रियंका बुल्गारीची जागतिक राजदूत बनणारी पहिली भारतीय महिला बनली.
लक्झरी ब्रँड 'बुल्गारी'च्या चार जागतिक चेहऱ्यांपैकी एक म्हणून प्रियांकाची नुकतीच घोषणा करण्यात आली, ती अशी करणारी पहिली भारतीय महिला ठरली!
8. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी प्रियंका चोप्रा
तो सर्वात खास विजय आपण कसा विसरू शकतो! प्रियांका केवळ 18 वर्षांची होती जेव्हा तिने जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले आणि देशाचा गौरव केला. तिने 2000 मध्ये मिस वर्ल्डचा ताज आणला आणि तिच्या आत्मविश्वास आणि सौंदर्यावर सर्वांनाच वेड लावले.
हेही वाचा - रणवीर आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शुंटिंग लांबणीवर