ETV Bharat / entertainment

Priyanka with John Cena : जॉन सीना, इद्रिस एल्बासोबत नवीन अ‍ॅक्शन फिल्ममध्ये झळकणार प्रियांका चोप्रा - सिटाडेलच्या प्रदर्शनसाठी प्रियांका सज्ज

तिच्या बहुप्रतिक्षित सिटाडेल या गुप्तचर मालिकेपूर्वी, प्रियांका चोप्राने दुसर्‍या प्रोजेक्टची बातमी शेअर केली ज्यामध्ये ती इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्यासोबत दिसणार आहे.

नवीन अ‍ॅक्शन फिल्ममध्ये झळकणार प्रियांका चोप्रा

author img

By

Published : Apr 6, 2023, 12:52 PM IST

मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलीवूडमधील मुख्य प्रवाहातील भूमिकांमध्ये दक्षिण आशियाई प्रतिनिधीत्वासाठी सुंदर मार्ग मोकळा केला आहे आणि भारताला जागतिक नकाशावर आणण्यास मदत केली आहे. तिच्या AGBO गुप्तचर मालिका सिटाडेल ( Citadel ) च्या जागतिक पदार्पणापूर्वी, प्रियांकाने एक नवीन हॉलीवूड प्रकल्प मिळवला आहे ज्यामध्ये ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत 'हेड्स ऑफ स्टेट' मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल.

दिग्दर्शक इल्या नैशुलरसोबत काम करणार प्रियांका चोप्रा - 'नोबडी' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक इल्या नैशुलर हे जोश अ‍ॅपेलबॉम आणि आंद्रे नेमेक यांच्या स्क्रिप्टचे दिग्दर्शन करत आहेत, ज्याचा प्रारंभिक मसुदा हॅरिसन क्वेरीच्या मूळ कल्पनेवर आधारित आहे. प्रियांकाने ही बातमी तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्ससोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. यात तिने इल्या नैशुलर यांच्या चित्रपटात जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम करत असल्याचे कळवले आहे.

सिटाडेलच्या प्रदर्शनसाठी प्रियांका सज्ज - दरम्यान, प्रियांका 'अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर' आणि 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम' फेम असलेल्या द रुसो ब्रदर्सने बनवलेल्या 'सिटाडेल' या वेब सीरिजच्या रिलीजसाठी सज्ज आहे. अ‍ॅक्शन-पॅक्ड शो दोन उच्चभ्रू एजंट मेसन केन (रिचर्ड मॅडेन) आणि नादिया (प्रियांका) यांच्याभोवती फिरतो जे सिटाडेल नावाच्या जागतिक गुप्तचर संस्थेशी संबंधित आहेत.

सिटाडेल हे रोमांचकारी नाट्य - या शोबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, कथा स्टंट्सशी जवळून गुंफलेली आहे. या प्रचंड अ‍ॅक्शन पीसमध्ये रोमांचकारी नाट्यमय गोष्ट ओतप्रोत भरलेली आहे. आपल्याला या पात्रांमध्ये बरेच काही पाहायला मिळणार आहे, म्हणजे ते कसे शारीरिकरित्या संवाद साधतात, केवळ उत्कृष्ट अ‍ॅक्शन सीक्वेन्सच नाही तर त्यातील प्रत्येकाच्या हृदयात एक नाटक आहे, त्यामुळे सर्व स्टंटमध्ये एक कथा गुंफलेली आहे. आणि ती माझ्यासाठी खूप छान आणि नवीन गोष्ट होती. 'सिटाडेल' 28 एप्रिलला जगभर प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच सिटाडेलच्या आशियायी प्रमोशनला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - Raveena Tandon Padma Shri : रवीना टंडनने राजामौलीसोबत दिली पोज, पाहा रवीना व कीरवाणींचे संस्मरणीय फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.