ETV Bharat / entertainment

अभिनेत्री प्रियांका चोप्राने सिद्धिविनायकांसह विविध मंदिरांचे घेतले दर्शन, दर्शन घेतानाचा फोटो व्हायरल - प्रियांका चोप्रा सिद्धिविनायक दर्शन

बॉलीवुडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूडमध्ये चांगलीच रुळली आहे. तरीही तिची ईश्वरावरील श्रद्धा आणि मुंबईवरील प्रेम तसूरभरदेखील कमी झालेले नाही. तिने मुंबईत आल्यानंतर सिद्धिविनायक मंदिराची गुरुवारी दर्शन घेतले. यावेळी तिची मुलगी मालती मेरीदेखील होती.

प्रियांका चोप्रा सिद्धिविनायक दर्शन
Priyanka Chopra Siddhivinayak Temple
author img

By

Published : Apr 7, 2023, 7:23 AM IST

Updated : Apr 7, 2023, 11:52 AM IST

मुंबई: प्रियांका तिच्या आगामी वेब सीरिज 'सिटाडेल'च्या प्रमोशनच्या कामामध्ये व्यस्त आहे. तिने वेळात वेळ काढून सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. तिचा मंदिरातील फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रियांका मुलीचा हात घट्ट धरून उभा राहिलेली दिसत आहे. नेहमीप्रमाणे फॅशनेबल ड्रेस न घालता मंदिरात तिने पारंपारिक ड्रेस परिधान घातलेला दिसून आला. सिद्धिविनायकाच्या मूर्तीसमोर प्रियांका मुलगी मालतीसह हात जोडताना दिसून आले आहेत.

निता अंबानी यांनी आयोजित केलेल्या एनएमएससीच्या कार्यक्रमात प्रियांका मुलगी मालती आणि पती गायक निक जोनाससह सहभाग घेतला. एनएमएससी हा निता अंबानी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या सेंटरमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. येथे अनेक नाटक व कार्यक्रमांचे बुकिंग हे फुल झाले आहे. प्रेक्षकांचा या सेंटरला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

सिटाडेल 28 एप्रिलला होणार प्रदर्शित प्रियांका हॉलीवूडमध्ये विविध सिनेमा व वेबसिरीजमध्ये काम करत आहे. एजीबीओ ही गुप्तचर मालिका प्रदर्शित होण्यापूर्वीच हेड्स ऑफ स्टेटमध्ये हा चित्रपट तिने मिळविला आहे. यामध्ये ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम करणार आहे. ती द रुसो ब्रदर्स निर्मित सिटाडेलमध्ये झळकणार आहे. हा अ‍ॅक्शनवर आधारित सिनेमा मेसन केन (रिचर्ड मॅडन) आणि नादिया (प्रियांका) या जागतिक गुप्तचर संस्थांच्या दोन खास एजंट्सभोवती फिरणार आहे. 'सिटाडेल' 28 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

नाईलाजाने सोडावे लागले बॉलीवुड ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा चांगलीच अव्वल स्थानावर आहे. बॉलीवुडमध्ये तिला अनेक चित्रपट मिळत नव्हते. जाणीवपूर्वक दिला चित्रपटसृष्टीतून बाजूला करण्यात येत होते, असा खुलासा प्रियांकाने केला होता. त्यानंतर तिने हॉलीवुडमध्ये नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिला अनेक चित्रपट मिळाले आहेत. तसेच तिच्या अभियनाचीदेखील खूप प्रशंसा झाली आहे. मागील आठवणी सोडून पुढे गेल्याचे प्रियांकाने म्हटले होते. प्रियांका चोप्राने गायक निकबरोबर विवाह केला आहे. त्यांना सरोगसीमधून मालती ही मुलगी झाली आहे. वैद्यकीय कारणांमुळे सरोगसीचा पर्याय निवडावा लागल्याचा खुलासादेखील प्रियांकाने केला होता.

हेही वाचा Priyanka with John Cena : जॉन सीना, इद्रिस एल्बासोबत नवीन अ‍ॅक्शन फिल्ममध्ये झळकणार प्रियांका चोप्रा

Last Updated : Apr 7, 2023, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.