ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra: मिस वर्ल्ड २००० प्रियांकासोबत कोण आहे ही मुलगी? ...बिग बॉस 17 साठी दिल्या शुभेच्छा - Mannaras childhood picture

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रानं शुक्रवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक जुना फोटो शेअर केलाय. यात ती एका लहान मुलीसोबत असल्याचं दिसतंय. तुम्ही ओळखंलंत का की ही मुलगी कोण आहे?

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 12:19 PM IST

मुंबई - Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या कामाची अपडेट्स तर ती चाहत्यांना सांगत असतेच, पण त्यासोबत आपल्या परिवारातील सदस्यांची ओळखही ती करुन देते. शुक्रवारी तिनं एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. यात ती एका शाळकरी मुलीसोबत दिसत आहे. अर्थात ही मुलगी तिच्या नात्यातली असेल असा प्राथमिक अंदाज आपण करु शकतो. हा अंदाज अर्थातच खरा आहे, ही छोटी मुलगी तिची चुलत बहिण आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रानं शुक्रवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला फोटो

प्रियांका चोप्रासोबत मन्नाराचा फोटो -

प्रियांका चोप्रानं २० ऑक्टोबरला हा छोट्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झालेली तिची चुलत बहिण मन्नारा चोप्रा आहे. प्रियांकानं इन्स्टाग्राम स्टोरीजवर मन्नारासोबतचा फोटो शेअर करुन लिहिलंय, ' छोट्या मन्नारासोबतचा जुना फोटो, 'गुड लक लिटिल वन.गुड लक लिटिल वन.' फोटोत मन्नारा आपली मोठी बहिण प्रियांका चोप्राशी जवळीक साधलेली दिसतेय.

बिग बॉस १७ मध्ये मन्नारा चोप्रा -

बिग बॉस या रिएालिटी शोचा 17 वा सिझन धुमधडाक्यात सुरू झालाय. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोचा पहिला भाग १५ ऑक्टोबरला प्रसारित झाला. 'इस बार गेम नहीं होगा सबके लिए सेम टू सेम' अशी थीम असलेला हा सिझन रंगतदारपणे सादर होताना दिसतोय. बिग बॉस १७ चे घर दिल, दिमाग आणि दम या तीन विभागात विभक्त झालंय. यामध्ये प्रियांका चोप्राची चुलत बहिण मन्नारा चोप्रा आत्मविश्वासानं वावरताना दिसतेय.

कोण आहे मन्नारा चोप्रा -

चोप्रा फॅमिलीत सौंदर्यवतींची खाण आहे म्हटल्यास वावगं ठरत नाही. कारण प्रियांचा चोप्रा नंतर तिची चुलत बहिण परिणीती चोप्रा बिहणीच्या पावलावर पाऊल चाकत बारतीय सिनेसृष्टीत आली होती. त्याचं वाटंनं मन्नारानं आपला प्रवास २०१४ मध्ये सुरू केलाय 'जिद' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटातून तिनं आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर तिनं दक्षिणेची वाट धरली. तेलुगू चित्रपटातून तिनं आपलं पुढील कारकिर्दी सुरू ठेवली आहे.

हेही वाचा -

१. Shilpa Shettys Husband Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने केला 'विभक्त' झाल्याचा खळबळजनक खुलासा

२. Tamannaah Bhatia Vijay Varma : विजय वर्माची काळजी घेताना तमन्ना भाटियाचा व्हिडिओ व्हायरल...

३. Sunny Deol Birthday: सनी देओलच्या वाढदिवसानिमित्त 'या' कलाकारांनी दिल्या शुभेच्छा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.