ETV Bharat / entertainment

गावपळणीच्या प्रथेत गुंफलेली थरारक प्रेमकथा "प्रेम प्रथा धुमशान", ट्रेलर झाला लाँच! - Prem Pratha Dhumshan a thrilling love story

कोकणातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटातून गावपळण ही प्रथा पहिल्यांदाच दिसणार आहे. गावपळण या प्रथेविषयीच मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे.

"प्रेम प्रथा धुमशान", ट्रेलर झाला लाँच!
"प्रेम प्रथा धुमशान", ट्रेलर झाला लाँच!
author img

By

Published : Oct 20, 2022, 5:17 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात अनेक प्रथा परंपरा आहे ज्या आजही पाळल्या जातात. अशीच एक प्रथा जी सिंधुदूर्गात आजही इमानेइतबारे पाळली जाते ती म्हणजे, गावपळण. गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटातून गावपळण ही प्रथा पहिल्यांदाच दिसणार आहे. गावपळण या प्रथेविषयीच मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे. त्यामुळेच अस्सल मालवणी भाषेतला, लोकसंस्कृतीवर आधारित "प्रेम प्रथा धुमशान" नक्कीच बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमशान घालणार यात शंका नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेम प्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातलं "धुमशान घाला रे" हे मालवणी गाणं सध्या सगळीकडे वाजत आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठरावीक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या प्रथेबाबत अनेक वदंता आहेत. मात्र आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून प्रेमप्रथा धुमशान हा चित्रपट तयार झाला आहे. मात्र या प्रेमकथेला विरोधाची किनार आहे. या प्रेमकथेत संघर्ष, विरोध आहे, श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा असं सारं काही असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.

'प्रेम प्रथा धुमशान" हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - सुंदर गुलाबी टच लेहेंग्यात शर्वरी वाघचे खट्याळ फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.