मुंबई - Preity Zinta : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'डिंपल गर्ल' प्रीटी झिंटा भलेही चित्रपटांपासून दूर असली, तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. प्रीटी लग्नापासून चित्रपटांपासून दूर आहे. ती तिच्या पतीसोबत परदेशात राहते. ती नेहमी तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. दरम्यान तिनं तिच्या इंस्टाग्रामवर आज 4 जानेवारी रोजी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रीटी पती जीन गुडइनफसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. प्रीटीनं फोटोत काळ्या रंगाच्या ट्रॅक सूट घातला आहे.
प्रीटीनं शेअर केला फोटो : प्रीटी झिंटानं तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पति परमेश्वर'. दरम्यान तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहे. एका चाहत्यानं या फोटोच्या कमेंट विभागात लिहिलं, ''बॉलिवूडमधली सर्वात सुंदर अभिनेत्री.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''प्रीटी नेहमीच सुंदर दिसते, मी तुझा चाहता आहे.'' आणखी एकानं लिहिलं, ''तुझा फोटो खूप सुंदर आहे.'' अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून प्रीटीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. प्रीटी झिंटानं याआधी आपल्या पतीसोबतचे न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पतीसोबत एन्जॉय करताना दिसली.
प्रीटी झिंटाचं लग्न : प्रीटी झिंटानं 29 फेब्रुवारी 2016 रोजी परदेशी बिझनेसमन जीन गुडइनफलासोबत लग्न केलं . या लग्नापासून तिला दोन जुळी मुले आहेत. अनेकदा प्रीटी मायदेशी पतीसोबत येत असते. काही दिवसापूर्वी प्रीटी ही प्रियांका चोप्रासोबत निक जोनासच्या म्यूजिक कॉन्सर्टमध्ये दिसली होती. यावेळी प्रियांका आणि प्रीटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान जर प्रीटीच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'भैयाजी सुपरहिट' या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अरशद वारसी, अमीषा पटेल, सनी देओल, पंकज त्रिपाठी आणि इतर कलाकार होते.
हेही वाचा :