ETV Bharat / entertainment

'आदिपुरुष'च्या टीमने घेतला सुधारण्याचा निर्णय, प्रदर्शनाची बदलली तारीख

आदिपुरुष चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून निर्मात्यांवर टीकेची झोड उठली आहे. यानंतर चित्रपटावर काम करत असलेल्या टीमने आता अधिक वेळ दृष्यांवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार असलेला आदिपुरुष हा चित्रपट पाच महिने पुढे ढकलण्यात आला आहे.

'आदिपुरुष'च्या टीमने घेतला सुधारण्याचा निर्णय

author img

By

Published : Nov 7, 2022, 10:16 AM IST

मुंबई - प्रभास, क्रिती सॅनन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर नवीन रिलीजची तारीख जाहीर केली. ओम राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर नवीन रिलीजची तारीख जाहीर केली. तपशील शेअर करताना त्यांनी लिहिले, ''जय श्री राम...#आदिपुरुष १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.''

त्यांनी एक फोटोही शेअर केला, ज्यामध्ये लिहिले आहे की, "आदिपुरुष हा चित्रपट नाही, तर प्रभू श्री राम यांच्यावरील आमची भक्ती आणि आमच्या संस्कृती आणि इतिहासाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व आहे. प्रेक्षकांना संपूर्ण दृश्य अनुभव देण्यासाठी, आम्हा चित्रपटावर काम करत असलेल्या टीमला जास्त वेळ आवश्यक आहे. आदिपुरुष आता १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होईल. भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचा पाठिंबा, प्रेम आणि आशीर्वादच आम्हाला या मार्गावरुन नेईल."

ओम राऊत दिग्दर्शित टी सीरीज आणि रेट्रोफिल्स द्वारे निर्मित 'आदिपुरुष' हा एक व्हिज्युअल एक्स्ट्राव्हॅगांझा आहे जो १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार होता. आता तो १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आहे. चित्रपटात प्रभासने प्रभू रामाची भूमिका केली आहे तर सैफने लंकेश रावणाची भूमिका केली आहे.

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या टीझरमध्ये सैफच्या भयंकर रावणाच्या लूकवर जोरदार प्रतिक्रिया उमटली. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत देशभरातील अनेकांनी निर्मात्यांची निंदा केली. खरं तर, अखिल भारतीय संत समिती या हिंदू धर्मगुरूंनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये हिंदू देवी-देवतांचे अयोग्य चित्रण केल्याचा आरोप करत सनातन सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे.

तसेच, अलीकडेच चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आदिपुरुषमध्ये दाखवण्यात आलेल्या भगवान राम आणि हनुमान यांना चामड्याचे पट्टे बांधल्यामुळे अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने चित्रित केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. निर्माता भूषण कुमार आणि ओम राऊत यांच्या विरोधात वकील राज गौरव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा - Alia Bhatt Baby Girl Birth : आनंदाची बातमी शेअर करत आलिया म्हणाली, मॅजिकल गर्ल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.