ETV Bharat / entertainment

Adipurush' new poster : आदिरपुषच्या पोस्टरमध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंगसह हनुमानच्या भूमिकेत झळकला मराठमोळा देवदत्त नागे - रामायण भव्य स्वरुपात

राम नवमीच्या निमित्ताने आदिपुरुष चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये राघवच्या भूमिकेतील राम, जानकीच्या भूमिकेतील क्रिती सेनॉन, लक्ष्मणच्या भूमिकेतील सनी सिंग आणि हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसत आहे.

आदिरपुषच्या पोस्टरमध्ये प्रभास
आदिरपुषच्या पोस्टरमध्ये प्रभास
author img

By

Published : Mar 30, 2023, 12:23 PM IST

मुंबई - राम नवमीच्या निमित्य साधून, 'आदिपुरुष' च्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर लाँच केले आहे. नवीन पोस्टरमध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे दिसत आहेत. ओम राऊत दिग्दर्शित, 'आदिपुरुष' हे महाकाव्य रामायणाचे नवीन स्वरुपात सादरीकरण आहे.

आदिपुरुषचे नवीन पोस्टर - गुरुवारी इन्स्टाग्रामवर कलाकारांनी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर पोस्टर शेअर केले. प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मंत्रों से बढके तेरा नाम जय श्री राम..." पोस्टरमध्ये राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, शेषच्या भूमिकेत सनी सिंग आणि बजरंगच्या भूमिकेत देवदत्त नागे त्यांना नमन करताना दाखवण्यात आले आहे.

भव्य स्वरुपात रामायण - रामायणाची सुंदर कथा भव्य पडद्यावर साकार होणार आहे. ज्यामध्ये जानकीचे लंकेशने केलेले अपहरण, राघव, लक्षमन आमि हनुमान यांनी लेंकेवर स्वीरी करुन जानकीला मुक्त करणे हे प्रसंग यात पाहायला मिळणार आहेत. लंकेशची भूमिका सैफ अली खानने साकारली आहे.

टीझर झाला होता ट्रोल - 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर 2 ऑक्टोबर रोजी अयोध्या, उत्तर प्रदेशच्या पवित्र भूमीत शरयूच्या तीरावर चाहत्यांसाठी आणि माध्यमांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट ५०० कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवला जात आहे आणि डोळ्यांना सुखद अनुभूती देणारी यात दृष्ये असतील अशी अपेक्षा आहे. तथापि, नेटिझन्स या टीझरवर खूश झाले नव्हते आणि इंटरनेटवर त्याच्या व्हीएफएक्ससाठी तो ट्रोल झाला होता. टी सीरीज आणि रेट्रोफिल्स द्वारे निर्मित 'आदिपुरुष' हा मेगा भारतीय चित्रपट एक व्हिज्युअल एक्स्ट्राव्हॅगांझा असल्याचे खात्री देणारा आहे. 'आदिपुरुष' हा पॅन इंडिया चित्रपट असून हिंदीसह तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होईल.

प्रभास वर्क फ्रंट - दरम्यान, वर्क फ्रंटवर, प्रभास श्रुती हासनसोबत 'सालार' मध्ये आणि 'प्रोजेक्ट के' मध्ये दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय संदीप रेड्डी वंगा यांचा 'स्पिरिट' आणि त्याने मारुती आणि 'आरआरआर'चे निर्माते डीव्हीव्ही दानय्या यांच्यासोबत सुपरनॅचरल अ‍ॅक्शन-थ्रिलरसाठी एकत्र काम केले आहे.

हेही वाचा - Ipl 2023 Opening Ceremony : आयपील उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींसह थिरकणार तमन्ना भाटिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.