मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान दोघेही आयपीएल मॅच एन्जॉय करताना दिसले. सामन्यादरम्यान दोघांना एकत्र पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. स्टेडियममध्ये चाहत्यांचे लक्ष क्रिकेटपेक्षा या दोन सेलिब्रिटींवर होते. सामन्यादरम्यान चाहते वारंवार 'परिणिती भाभी...परिणिती भाभी...' असा जयघोष करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही सेलेब्स 13 मे रोजी एंगेजमेंट करणार आहेत. दरम्यान, दोघेही आयपीएलच्या स्टेडियममध्ये एकत्र दिसले. इतके दिवस ते डेट करत होते, एकत्र दिसत होते, त्यावेळी पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियासमोर आणत होते. आता मात्र ते स्वतःच करोडो लोक पाहात असलेल्या आयपीएल सामन्याला उपस्थित राहून आपल्या प्रेमाचे दर्शन घडवले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
परिणीती आणि राघव चढ्डाचे आयपीएल फोटोशूट - मॅचदरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी पोज देताना फोटोशूटही केले. दोघेही ब्लॅक ड्रेसमध्ये दिसले. तर परिणीती डीप नेक असलेल्या काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. त्याचवेळी आप नेते राधव चढ्ढा यांनीही काळा शर्ट घातलेला दिसत आहे. सामन्यादरम्यान दोघांच्याही चेहऱ्यावर हसू दिसत होते. आयपीएल दरम्यान, दोघेही व्हीव्हीआयपी स्टँडवरून 'परिणिती भाभी..' चीअर्स करणाऱ्या प्रेक्षकांना हात हलवून अभिवादन करत होते. सोशल मीडियावर चाहते दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी आणि सतत लाईक कमेंट करत आहेत. एका यूजरने 'राजकारण ते परिणीतीपर्यंतचा प्रवास'असे लिहिले आहे. एका युजरने कमेंट केली 'केजरीवाल यांनी केलेला बदल. पंजाबमध्ये जेवढे खासदार, आमदार आणि एमएलसी आहेत, ते सरकार आल्यावर सगळेच लग्न करत आहेत.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
परिणीतेने शेअर केला व्हिडिओ - परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आयपीएल सामन्यादरम्यानचा एक फोटो आणि 3 व्हिडिओ शेअर केले आहेत. पण यामध्ये राधव चढ्ढा एकत्र दिसत नाहीत. एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्टेडियमचे दृश्य दाखवत आहे. दुसऱ्यामध्ये व्हीव्हीआयपी गॅलरी दाखवली जात आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पाहुण्यासोबत बसलेली दिसत आहे. परिणीतीच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कमेंट करून चाहते सतत प्रेम आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - Sushmita Sen News : गौरी सावंतची भूमिका साकारण्यासाठी सुष्मिता सेनने मनापासून शिकला प्रत्येक संवाद