ETV Bharat / entertainment

पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं'च्या दुसऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद - ट्रेलर रिलीज

Main Atal hoon trailer 2 : अभिनेता पंकज त्रिपाठी अभिनीत 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित प्रकदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर पसंतीस उतरल्याच्या अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत.

Main Atal hoon trailer 2
मैं अटल हूं ट्रेलर २
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 10:36 AM IST

मुंबई - Main Atal hoon trailer 2 : अभिनेता पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. रुपेरी पडद्यावर कॉमेडी चित्रपट आणि खलनायकी पात्र त्याने खूप उत्तम प्रकारे साकारली आहेत. दरम्यान त्याचा ' मैं अटल हूं' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत तो खूप दमदार दिसतआहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक, 'मैं अटल हूं'ची वाट आता अनेकजण पाहत आहेत. दरम्यान या चित्रपटामधील दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अटलबिहारी वाजपेयी हे देशासाठी कठीण निर्णय घेताना दिसत आहे.

'मैं अटल हूं'चा दुसरा ट्रेलर रिलीज : काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर अनेकांना आवडला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर सोशल मीडियावर खळबळ उडवतांना दिसत आहे. अटलबिहारी वाजपेयी हे फक्त राजकारणी नव्हते तर एक कवी आणि महान नेते देखील होते. विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, लीजेंड स्टुडिओज ,संदीप सिंग आणि कमलेश भानुशालीनं त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेत 'मैं अटल हूं' हा चित्रपट निर्मित केला आहे. या चित्रपटामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा देशासाठी केलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मैं अटल हूं' हा चित्रपट कधी होणार रिलीज : पंकज त्रिपाठी 'मैं अटल हूं' चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांचा तीन वेळा पंतप्रधान झालेल्या प्रवासाची माहिती जगसमोर आणेल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोखरणमधील विजय, लाहोर बस यात्रा, रामजन्मभूमी आणि कारगिल युद्धावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विनोद भानुशाली प्रस्तुत 'मैं अटल हूं'चं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. हा चित्रपट ऋषी विरमणी आणि रवी जाधव यांनी लिहिलेला आहे. 'मैं अटल हूं' चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीशिवाय हर्षल गिरे, हर्षद कुमार, मधु सिंग, लवकुश कुंडू, पियुष मिश्रा हे कलाकर दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. उद्योगांपाठोपाठ फिल्मफेअरही गुजरातला, हा तर मुंबईतील फिल्म इंडस्ट्री पळवण्याचा डाव?
  2. अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'कंगुवा'मधील दुसरे पोस्टर रिलीज
  3. विजय सेतुपती वाढदिवसानिमित्त 'हे' 5 चित्रपट जरूर पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.