ETV Bharat / entertainment

अश्वत्थामाची भूमिका साकारणार शाहिद कपूर, विकी कौशलचा पत्ता कट - शाहिद कपूरचा आगामी चित्रपट

Shahid Kapoor to Play Ashwatthama : अभिनेता शाहिद कपूर हा 'अश्वत्थामा'ची भूमिका साकारणार आहे. हा आगामी चित्रपट पौराणिक असणार आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल झाली आहे.

Shahid Kapoor to Play Ashwatthama
शाहिद कपूर साकारणार अश्वत्थामाची भूमिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 5:44 PM IST

मुंबई - Shahid Kapoor to Play Ashwatthama : अभिनेता शाहिद कपूर अखेरचा 'ब्लडी डॅडी' चित्रपटात जबरदस्त काम करताना दिसला होता. आता शाहिद कपूर आणखी एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहिद एका पौराणिक चित्रपटात दिसणार आहे. या पौराणिक चित्रपटात शाहिद कपूर हा 'अश्वत्थामा'ची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी शाहिदशी संपर्क साधण्यात आला आहे आणि त्यानं ही ऑफर स्वीकारली आहे. सध्या या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शाहिद कपूर दिसणार अश्वथामाच्या भूमिकेत : रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल झाली आहे. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होऊ शकते, अशीही बातमी आहे. या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी आणि जॅकी भगनानी करत आहेत. बॉलिवूडलाइफ डॉट कॉमच्यानुसार, हा चित्रपट आकर्षक दिसण्यासाठी भरपूर व्हिएफएक्स वापरले जाणार आहे. जागतिक व्हीएफएक्स टीमसोबत ही योजना आखली जात आहे. शाहिद कपूर लवकरच या चित्रपटासाठी जोरदार कसरत करून अश्वथामाच्या भूमिकेसाठी त्याची बॉडी बनविण्यासाठी जिममध्ये घाम गाळताना दिसेल.

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट : हा चित्रपट हिंदू महाकाव्य महाभारतावर आधारित असणार आहे. या चित्रपटात गुरू द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाचे जीवन दाखवण्यात येणार आहे. असे म्हणतात की, महादेवानं अश्वत्थामाला अमरत्वाचं वरदान दिले होते. त्यानंतर श्रीकृष्णानं त्याला दीर्घकाळ पृथ्वीवर भटकत राहण्याचा शाप देखील दिला होता. दरम्यान या चित्रपटाचे निर्माते वासू भगनानी आणि जॅकी भगनानी सध्या या चित्रपटावर काम करत आहेत. यापूर्वी विकी कौशलचे नाव या चित्रपटाशी जोडले गेले होते. शाहिदच्या या चित्रपटावर लवकरच काम सुरू होणार आहे. या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन कन्नड चित्रपट दिग्दर्शक सचिन रवी हे करणार आहेत. आदित्य धर चार वर्षांपासून या चित्रपटावर काम करत होते. त्यांना विकी कौशलला या चित्रपटामध्ये कास्ट करायचे होते. मात्र आता ही भूमिका शाहिद कपूरला मिळाली आहे.

हेही वाचा :

  1. विकी कौशलनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त केला शेअर व्हिडिओ
  2. प्रभास आणि टेड सारंडोसची ग्रेट भेट, राणा दग्गुबतीच्या घरी सेलेब्रिटींसह नेटफ्लिक्सच्या सीईओची पार्टी
  3. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'चा जगभर डंका, पाहा किती केली कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.