ETV Bharat / entertainment

Jeta Movie : नितीश चव्हाण आणि स्नेहल देशमुख 'जेता' मधून झळकणार मोठ्या पडद्यावर! - jeta movie

चित्रपट मालिकांमध्ये प्रेक्षकांनी अधिक गुंतावे म्हणून निर्माते दिग्दर्शक नेहमीच नवनवीन जोड्या जुळवून आणत असतात. म्हणूनच चंदेरी दुनियेत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. 'जेता' (jeta movie) या आगामी मराठी चित्रपटात अशीची एक नवी कोरी जोडी रसिकांचे मनोरंजन करणार आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचल्यावर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा नीतिश चव्हाण (Nitish Chavhan) आणि स्नेहल देशमुख (Snehal Deshmukh) यांची जोडी 'जेता'चे मुख्य आकर्षण बनले आहे.

Jeta Movie
जेता चित्रपट
author img

By

Published : Nov 11, 2022, 4:21 PM IST

मुंबई: चित्रपट मालिकांमध्ये प्रेक्षकांनी अधिक गुंतावे म्हणून निर्माते दिग्दर्शक नेहमीच नवनवीन जोड्या जुळवून आणत असतात. म्हणूनच चंदेरी दुनियेत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. कोणताही लेखक-दिग्दर्शक कथानक आणि कॅरेक्टरच्या आवश्यकतेनुसार कलाकारांची निवड करत असतो. यामुळे चित्रपटांमध्ये कधी जुन्याच जोड्या नव्या कॅरेक्टरमध्ये दिसतात, तर कित्येकदा नवीन जोड्या जुळवत कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.

नवी कोरी जोडी: मुख्य कलाकारांची निवड हा लेखक-दिग्दर्शकापुढील मोठा टास्क असतो. कथानकाची गरज ओळखून मुख्य भूमिकेत अचूक कलाकारांची निवड करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुढील प्रवास सोपा बनतो. 'जेता' या आगामी मराठी चित्रपटात अशीची एक नवी कोरी जोडी रसिकांचे मनोरंजन करणार आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचल्यावर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा नीतिश चव्हाण (Nitish Chavhan) आणि स्नेहल देशमुख यांची जोडी 'जेता'चे मुख्य आकर्षण बनले आहे.

जिद्दी तरुणाची कथा: या चित्रपटाच्या माध्यमातून एका जिद्दी तरुणाची कथा रसिकांसमोर आणण्यासाठी निर्माते संजय लक्ष्मणराव यादव आणि दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांना एका कणखर अभिनेत्याची गरज होती. खरे तर चित्रपटाच्या लेखन प्रक्रियेपासूनच त्यांच्या नजरेसमोर एक नाव होते. ते म्हणजे नीतिश चव्हाण... झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय झालेल्या 'लागीरं झालं जी' या मालिकेत अजयची मुख्य भूमिका साकारणाऱ्या नीतिशचा 'जेता' चित्रपटापर्यंतचा प्रवास खूप रोमांचक आहे. 'हर हर महादेव', 'सोयरीक', 'मजनू' आणि 'चतुर चोर' या चित्रपटांमध्ये नीतिशच्या अभिनयाची विविध रूप प्रेक्षकांसमोर आले आहेत. आता या चित्रपटात तो परिस्थितीपुढे हतबल न होता लढणाऱ्या एका जिगरबाज तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वपूर्ण संदेश: त्याच्या जोडीला स्नेहल देशमुख (Snehal Deshmukh) ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. स्नेहलने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. नीतिश आणि स्नेहल या दोघांची अनोखी केमिस्ट्री (Chemistry of nitin and snehal) या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नीतिशने या चित्रपटात एक जिद्दी तरुण साकारला असून, त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या एका श्रीमंत कुटुंबातील तरुणीच्या भूमिकेत स्नेहल दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी एका फ्रेश जोडीची आवश्यकता होती. नीतिश-स्नेहलच्या रूपात ती पूर्ण झाल्याचे मत दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन (Yogesh Mahajan) यांनी व्यक्त केले आहे. अनेकांसाठी प्रेरणादायी ठराव्या अशा या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण संदेशही दडला असल्याचंही महाजन म्हणाले.

संकलनाची जादू या चित्रपटात अनुभवायला मिळणार: नीतिश-स्नेहल या जोडीसोबत या चित्रपटामध्ये शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे, कुणाल मेश्राम आदी कलाकार आहेत. 'जेता'ची कथा संजय लक्ष्मणराव यादव यांनी लिहिली आहे. योगेश सबनीस आणि योगेश साहेबराव महाजन यांच्या साथीने संजय लक्ष्मणराव यादव यांनीच पटकथालेखनही केले आहे. याशिवाय संजय लक्ष्मणराव यादव यांनी येगेश सबनीस यांच्यासोबत संवादही लिहिले आहेत. डिओपी अनिकेत के. यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी रसिकांना खिळवून ठेवणारी असून, संकलक हर्षद वैती यांच्या संकलनाची जादू या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. येत्या 25 नोव्हेंबरला जेता हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.