ETV Bharat / entertainment

नवविवाहित अरबाज खान आणि शशूरा खान नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विमानाने रवाना - Arbaaz Shura Khan jet off

नवविवाहित अभिनेता अरबाज खान त्याची पत्नी शशूरा खानसोबत शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसला. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रवाना होण्यापूर्वी दोघांनीही पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्या.

Newlyweds Arbaaz Khan, Shsura Khan
अरबाज खान आणि शशूरा खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 12:50 PM IST

मुंबई - अभिनेता अरबाज खानसाठी नवीन वर्ष खरोखरच खास असणार आहे. तो 2024 या नव्या वर्षाचे स्वागत नव्या पत्नीसह साजरा करण्यासाठी विमानाने रवाना झाला. शनिवारी सकाळी हे नवविवाहित जोडपे मुंबई विमानतळावर दिसले आणि त्यांनी पापाराझींना आनंदाने पोज दिल्या.

ऑनलाइन समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अरबाज काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातलेला दिसत आहे. प्रवासासाठी शशूराने राखाडी को-ऑर्डर सेटची निवड केली होती. अरबाज आणि शशुरा यांचा निकाह 24 डिसेंबर रोजी अरबाजची बहीण अर्पिता खान शर्माच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडला. समारंभानंतर अरबाजने इंस्टाग्रामवर शशूरासोबतच्या त्याच्या पवित्र नात्याच्या बंधनाची घोषणा एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली होती. आपल्या प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीत आयुष्याची नवीन सुरुवात करत असल्याचं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं होतं. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

अभिनेत्री रवीना टंडन, रिद्धिमा पंडित, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख देखील अरबाज आणि शुराच्या निकाह समारंभात उपस्थित होते तसेच सलीम खान, सलमा खान, हेलन, सलमान खान, सोहेल खान आणि अलविरा अग्निहोत्री यांच्यासह कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. अरबाजच्या या दुसऱ्या लग्नाला त्याचा मुलगा अरहान खानही हजर होता. विशेष म्हणजे त्यानं सलमान खानसोबत या लग्नात डान्सही केला होता. या लग्नाकडे मात्र मलायका अरोरानं पाठ फिरवली व याबाबत मौन बाळगणं पसंत केलं. अद्यापही तिनं सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अरबाजने यापूर्वी मलायका अरोरासोबत लग्न केले होते. 2016 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2017 मध्ये त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. या जोडप्याला अरहान नावाचा मुलगा आहे. अरबाजने जॉर्जिया एंड्रियानीलाही डेट केले होते परंतु दोघांनी गेल्या वर्षी हे नाते संपवले होते. बातमीनुसार, अरबाज आणि मेकअप आर्टिस्ट शशूरा यांची पहिली भेट त्याच्या आगामी 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा -

  1. 'डंकी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा केला पार
  2. 'सालार'नं आणलं बॉक्स ऑफिसवर वादळ, छप्परफाड कमाई सुरूच
  3. दिग्दर्शक मारुतीच्या चित्रपटात नव्या अवतारात झळकणार अभिनेता प्रभास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.