मुंबई Netflix Delete Annapoorani : प्रसिद्ध चित्रपट निर्माता क्रिस्टोफर कनकराज यांनी नुकतीच एक पोस्ट एक्सवर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरून हटवण्यात आल्याचं सांगितलं. 'अन्नपूर्णी' चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ओटीटीवर एका आठवड्यापूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचं स्ट्रीमिंग थांबवण्यात आलं आहे. हिंदू आयटी सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला आहे की, हा चित्रपट हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. मुंबई पोलिसांनी तक्रार मिळाल्याचं स्पष्ट केलंय. त्याचवेळी तक्रारदारानं पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेता येईल असं म्हटलंय.
-
Lady Superstar’s movie which was released a week back in Netflix has now been removed from the streaming platform 😕 pic.twitter.com/if6R1775Wx
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) January 11, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Lady Superstar’s movie which was released a week back in Netflix has now been removed from the streaming platform 😕 pic.twitter.com/if6R1775Wx
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) January 11, 2024Lady Superstar’s movie which was released a week back in Netflix has now been removed from the streaming platform 😕 pic.twitter.com/if6R1775Wx
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) January 11, 2024
'अन्नपूर्णी' काढून टाकण्याचा नेटफ्लिक्सला इशारा : अन्नपूर्णीतील भावना दुखावणाऱ्या डायलॉगमुळे अभिनेत्री नयनतारा, अभिनेता जय, लेखक-दिग्दर्शक नीलेश कृष्णा, निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोयंका, झी स्टुडिओचे मुख्य अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या प्रमुख मोनिका शेरगिल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष सुरू असताना, झी स्टुडिओज, नाद एस स्टुडिओज निर्मित 'अन्नपूर्णी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 'अन्नपूर्णी' चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलेश कृष्णा यांनी मात्र समर्थन केलं आहे. तर रमेश सोलंकी यांच्याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते श्रीराज नायर यांनीही नेटफ्लिक्सला चित्रपट काढून टाकण्याचा इशारा दिला होता.
-
I have filed complain against #AntiHinduZee and #AntiHinduNetflix
— Ramesh Solanki🇮🇳 (@Rajput_Ramesh) January 6, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
At a time when the whole world is rejoicing in anticipation of the Pran Pratishtha of Bhagwan Shri Ram Mandir, this anti-Hindu film Annapoorani has been released on Netflix, produced by Zee Studios, Naad Sstudios… pic.twitter.com/zM0drX4LMR
">I have filed complain against #AntiHinduZee and #AntiHinduNetflix
— Ramesh Solanki🇮🇳 (@Rajput_Ramesh) January 6, 2024
At a time when the whole world is rejoicing in anticipation of the Pran Pratishtha of Bhagwan Shri Ram Mandir, this anti-Hindu film Annapoorani has been released on Netflix, produced by Zee Studios, Naad Sstudios… pic.twitter.com/zM0drX4LMRI have filed complain against #AntiHinduZee and #AntiHinduNetflix
— Ramesh Solanki🇮🇳 (@Rajput_Ramesh) January 6, 2024
At a time when the whole world is rejoicing in anticipation of the Pran Pratishtha of Bhagwan Shri Ram Mandir, this anti-Hindu film Annapoorani has been released on Netflix, produced by Zee Studios, Naad Sstudios… pic.twitter.com/zM0drX4LMR
'अन्नपूर्णी' चित्रपटामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या : रमेश सोलंकी यांनी दिलेल्या तक्रारीत असं लिहिलं आहे की, हा चित्रपट 'लव्ह जिहाद'चे प्रमोशन करत आहे. मात्र, नयनताराची 'अन्नपूर्णी' आणि फरहान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सनं 10 जानेवारी ला 'अन्नपूर्णी' या चित्रपटाचं स्ट्रीमिंग थांबवलं. आता याबद्दल झी स्टुडिओनं विश्व हिंदू परिषदेकडे माफी मागत सांगितलं की, ''आक्षेपार्ह मजकूर काढला जाईल, तोपर्यंत हा चित्रपट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल.'' समाजाच्या भावना दुखावल्या आणि झालेल्या गैरसोयीबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलगिरी व्यक्त केली. 'अन्नपूर्णी'मध्ये नयनतारा, सत्यराजा, जय, अच्युथ कुमार, के एस रविकुमार, कार्तिक कुमार आणि रेणुका यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा :