ETV Bharat / entertainment

Nayanthara Instagram Debut : नयनताराचे इन्स्टाग्रामवर पदार्पण, 'जवा पोस्टसह पोस्ट केला जुळ्या मलांसोबतचा धमाल व्हिडिओ - जवान

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट आणि नुकताच रिलीज झालेला ट्रेलर सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कधी रिलीज होणार यासाठी चाहते वाट पाहत आहे. दरम्यान आता नयनताराने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्याना सुंदर भेटी दिली आहे. काय आहे ही पोस्ट जाणून घ्या...

Nayanthara
नयनतारा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 2:39 PM IST

मुंबई : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामुळे साऊथ अभिनेत्री नयनतारा ही सध्या खूप चर्चेत आहे. नयनताराचा शाहरुख खानसोबतचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. नयनताराने 31 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. नयनतारा आतापर्यंत इस्टाग्रामवर नव्हती पण तिने फक्त 'जवान' चित्रपटासाठी इंस्टाग्रामवर काही पोस्ट केल्या आहेत. नयनताराच्या या पोस्ट सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. याशिवाय नयनताराने तिच्या जुळ्या मुलांसोबतचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

नयनताराने शेअर केला व्हिडिओ : या व्हिडिओत ती आपल्या मुलांसोबत आहे. नयनताराच्या या पोस्टला सोशल मीडियावर खूप लाईक मिळत आहे. नयनताराचा पती विघ्नेश शिवनने आपल्या पत्नीच्या पोस्टवर लिहिले आहे, 'मेरे उइरिस... इंस्टाग्रामवर आपले स्वागत आहे'. त्याचबरोबर साऊथ सुपरस्टार विजयने या पोस्टवर लिहिले, 'इंस्टाग्रामवर लेडी सुपरस्टारचे स्वागत आहे'. तसेच नयनताराने इंस्टाग्रामवर अकाउंट बनविल्यानंतर 1 लाख 12 चाहत्यांनी तिला फॉलो केले आहेत. नयनताराची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. त्याचबरोबर आता 24 तासांत नयनताराला किती चाहते फॉलो करतील हे बघणे लक्षणीय ठरणार आहे.

'जवान'चा ट्रेलर : गेल्या महिनाभरापासून 'जवान'च्या ट्रेलरबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. 'जवान'चा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज होताच 30 मिनिटांतच या ट्रेलरला 2 मिलियन लोकांनी पाहून लाईक केले आहेत. यासोबतच किंग खान 31 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता बुर्ज खलिफा येथे ट्रेलर लाँच करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे या चित्रपटाची निर्मिती करणयात आली आहे. याशिवाय गौरी खान आणि गौरव वर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात नयनतारा आणि शाहरुख व्यतिरिक्त विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, संजय दत्त, रिद्धी डोगरा, योगी बाबू हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Sister Shweta Singh Kirti : रक्षाबंधनावर सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भावनिक पोस्ट...

trailer of Jawan : 'जवान' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज, शाहरुखच्या अ‍ॅक्शनसवर चाहते फिदा

Raksha Bandhan 2023: बॉलिवूड सेलेब्रिटींनी उत्सहात साजरा केला रक्षाबंधनाचा सण, बहिणीसोबतचे फोटो केले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.