ETV Bharat / entertainment

अन्नपूर्णी वादावर नयनताराने सोडले मौन, पहिल्यांदाच व्यक्त केली भावना - Actress Nayantara

Nayanthara breaks silence on Annapoorni : नयनताराची भूमिका असलेल्या 'अन्नपूर्णी' या चित्रपटात भगवान रामाच्या मांसाहारा संदर्भात असलेल्या संवादामुळे वाद निर्माण झाला होता. या विरोधात तक्रारी झाल्यानंतर नेटफ्लिक्सवरुन या चित्रपटाचं प्रसारण थांबवण्यात आले होते. या वादावर आजपर्यंत अभिनेत्री नयनतारानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पहिल्यांदाच तिनं याबाबत आपले मौन सोडले आहे.

Nayanthara breaks silence on Annapoorni
अन्नपूर्णी वादावर नयनताराने सोडले मौन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 10:16 AM IST

मुंबई - Nayanthara breaks silence on Annapoorni : अभिनेत्री नयनताराची भूमिका असलेला 'अन्नपूर्णी : द गॉडेस ऑफ फूड' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाचं स्ट्रिमिंग नेटफ्लिक्स या ओटीटीवर सुरू झाले. चित्रपटातील भगवान रामाच्या मांसाहारा संदर्भात असलेल्या संवादामुळे नव्या वादाला जन्म दिला. नयनतारा आणि इतर कलाकारांवर या प्रकरणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. तयार झालेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट काढून टाकला होता.

नयनताराच्या 'अन्नपूर्णी' चित्रपटाची कथा शेफ बनू इच्छिणाऱ्या पूजाऱ्याच्या मुलीची गोष्ट आहे. पंरपरेनं घरामध्ये मंदिरात देवासाठी प्रसाद बनवणाऱ्या पूजाऱ्याची अन्नपूर्णी ही मुलगी शेफ बनत असताना तिला मांसाहाराचेही सेवन करावं लागतं. शेफ बनण्यासाठी मांसाहाराची चव माहिती असायला हवी या गोष्टीची महत्त्व सांगताना एक पात्र तिला मांसाहारा सदर्भात काही गोष्टी सांगते. त्यातील एक संवाद काही लोकांना खटकला आणि वादाला सुरुवात झाली. यामुळे अनेक लोकांच्या धार्मिक श्रद्धा दुखावल्या गेल्या आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. नेटफ्लिक्सवरून चित्रपट काढून घेतल्यानंतर, नयनताराने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागत असल्याचा एक संदेश पोस्ट केला आहे.

नयनताराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील लांबलचक संदेशाचं कॅप्शन आहे : "देवाचा आशीर्वाद असो" (हात जोडलेल्या इमोजीसह). पुढील मजकूर तिने इंग्रजी, तमिळ आणि हिंदीमध्ये शेअर केला याची सुरुवात तिने 'जय श्री राम'ने केली.

नयनताराने शेअर केलेल्या संदेशाचे मराठी अनुवाद असा आहे.

"मी हा लेख जड अंतःकरणाने आणि सत्यतेच्या आधारावर लिहित आहे. मागच्या काही काळात आमच्या अन्नपूर्णी चित्रपटासंदर्भात जे काही वातावरण निर्माण झालं आहे, त्यासंबंधी सर्व देशवासियांना मला निवेदन करायची इच्छा आहे. कोणत्याही चित्रपटाचा हेतू केवळ नफा मिळवणे असा असत नाही, तर एक संदेश देणेही असतो. हेच मी अन्नपूर्णीच्या बाबतीत म्हणेन की, याच्याशी संबंधीत भावना आणि मेहनत एका सच्चा विचाराने केली गेली आहे, ज्याचा उद्देश जीवन प्रवासाचे प्रतिबिंब दाखवणे आणि दृढ इच्छ शक्तीने अडचणींवर मात करणे आहे.

एक साकारात्मक संदेश देण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात आमच्याकडून नकळतपणे आपल्या भावना दुखावल्या गेल्या. सेन्सॉरने संमत केलेला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर तो ओटीटीवरुन हटवला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगली नव्हती. माझा आणि माझ्या टीमचा हेतू तुमच्या भावना आणि आस्था दुखावण्याचा नव्हता. असे कृत्य करणे हे माझ्या विचारांपासून कोसो मैल दूर आहे कारण मी स्वतः भगवानवर आस्था ठेवणारी आहे आणि देशातील तिर्थस्थळांना भेटी देणारी आहे. याविषयीचे गांभीर्य समजून घेऊन ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्या तमाम लोकांची मी माफी मागते.

अन्नपूर्णीमागचा आमचा उद्देश कोणालाही त्रास देणे नव्हता तर चांगला बदल घडवून आणणे आणि प्रेरणा देणे हा होता.

गेल्या दोन दशकांपासून चित्रपट व्यवसायातील माझ्या प्रवासाचा उद्देश शिकणे आणि साकारात्मकता वाढवणे हाच राहिला आहे.

स्नेह आणि शुभेच्छांसह : नयनतारा."

हेही वाचा -

  1. 20 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सांगता; वेगवेगळे महोत्सव प्राधान्याने आयोजित होणे गरजेचे - विकास खारगे
  2. संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तला लग्नाआधी बनायचं आहे आई, केली इच्छा व्यक्त
  3. अयोध्येत निमंत्रण असूनही ज्यु. एनटीआर राममंदिर उद्घाटनात राहणार गैरहजर, जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.