मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकीवरील आरोपांची मालिका वाढतच चालली आहे. गेल्या काही दिवसापासून पत्नी आलिया सिद्दीकीने आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनच्या घरी काम करणाऱ्या सपना नावाच्या मुलीनेही आपल्याला डांबून ठेवल्याचे व पगार न दिल्याची तक्रार एका व्हिडिओतून केली आहे. सपनाच्या म्हणण्यानुसार तिला नवाजुद्दीनने त्याच्या दुबईतील घरी मुलांच्या देखभालीसाठी नेमले होते. आता तिचे म्हणणे आहे की ती याच ठिकाणी अडकली असून तिला भारतात परत यायचे आहे व तिचा पगार मिळाला नसल्याचेही तिने सांगितले आहे.
-
Please spare the poor 20 year old girl who is working hard to support her family. She is not an actor to read scripts
— Advocate Rizwan Siddiquee (@RizwanSiddiquee) February 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Making such baseless allegations against someone weak & helpless is quite disheartening. If the matter progresses then the Courts will decide the matter on merits https://t.co/k5HqNakHhr
">Please spare the poor 20 year old girl who is working hard to support her family. She is not an actor to read scripts
— Advocate Rizwan Siddiquee (@RizwanSiddiquee) February 19, 2023
Making such baseless allegations against someone weak & helpless is quite disheartening. If the matter progresses then the Courts will decide the matter on merits https://t.co/k5HqNakHhrPlease spare the poor 20 year old girl who is working hard to support her family. She is not an actor to read scripts
— Advocate Rizwan Siddiquee (@RizwanSiddiquee) February 19, 2023
Making such baseless allegations against someone weak & helpless is quite disheartening. If the matter progresses then the Courts will decide the matter on merits https://t.co/k5HqNakHhr
वकील रिजवान सिद्दीकीने शेअर केला व्हिडिओ - वकील रिजवान सिद्दीकीने ट्विटरवर एका मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या दुबईतील घरामध्ये एक मुलगी विनाकरण अडकली आहे. ही मुलगी ईस्ट नावाच्या कंपनीची सेल्स मॅनेदर आहे. असे असले तरी ती नवाजच्या घरामध्ये मुलांचे देखभाल करण्याचे काम करत होती. सध्या नवाज आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू असल्याने मुले नवाजच्या पत्नीकडे भारतात आहेत.
नवाजच्या मोलकरणीचे आरोप - वकील रिजवान सिद्दीकीने या प्रकरणात भारत सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. हे वकिल रिझवान सिद्दीकी हे नवाजच्या पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील आहेत. दुबईत नवाजुद्दीनच्या घरी फसलेल्या सपनाने नवाजुद्दीनवर आरोप केला आहे की मॅडम गेल्यानंतर वीजा बनवला होता व त्याचे पैसे पगारातून कापले जात होते. गेल्या दोन महिन्यापासून तिला पगार अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. सपनाने व्हिडिओत म्हटलंय की ती दुबईतील नवाजच्या घरी एकटी असून तिच्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. ती इथून आपली सुटका होण्याची व भारतात सुखरुप परतण्याची इच्छा बोलून दाखवत आहे. दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आलियाने न्यायालयाकडे लहान मुलगा नवाजुद्दीनचा असल्याचे सिध्द करण्यासाठी पॅर्निटी चाचणी करण्याची मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी नवाजची आई मेहरुनिसा यांनी सुनेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
नवाजुद्दीनचे आरोपावर मौन - सपना या मुलीचा वकील रिजवान सिद्दीकीने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनला आहे. नवाजुद्दीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याच्या विरोधात सुरू असलेल्या या चिखफेकीमुळे निश्चितच त्याच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. मात्र नवाजवर प्रेम करणाऱ्या त्याच्या अनेक चाहत्यांना हा मुद्दामहुन त्याला बदनाम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे वाटते. मुंबई पोलिसांनीही आलियाच्या विरोधातील तक्रारीनंतर हे प्रकरण मालमत्तेच्या वादाशी संबंधित असल्याचा खुलासा केला होता.
नवाजुद्दीनच्या पत्नीचे आरोप - आलिया सिद्दीकीने मध्यंतरी नवाजवर अनेक आरोप करत आपण त्याला त्याच्या पडत्या काळात कशी मदत केली होती हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या नावावरील मालमत्ता विकून नवाजसाठी कार खरेदी केल्याचेही तिने सांगितले होते. सध्या नवाज आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद न्यायालयात सुरू असून जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत असे सतत आरोप प्रत्यारोप होतील असेच दिसते.
हेही वाचा - व्हायरल किसनंतर भूमी पेडणेकर कथित बॉयफ्रेंडसोबत पुन्हा दिसली - पाहा फोटो