हैदराबाद - माजी बॉलीवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पती महेश बाबूसह मुले सितारा आणि गौतम यांच्याशी संवाद साधतानाचा फोटो पोस्ट केला आहे. नम्रताने या फोटोला 'माझे 3 मस्केटियर्स परत एकत्र' असे कॅप्शन दिले आहे. महेश बाबूने पांढर्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. फोटोत तिघे हसताना दिसत आहेत. थ्री मस्केटियर्स हे फ्रेंच भाषेत लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. १८४४ मध्ये लेखक अलेक्झांडर धुमार यांनी लिहिलेली ही एक साहसी कादंबरी होती. यातील मस्केटियर्सचा अर्थ सर्वाधिक प्रिय असा होतो. याच अर्थाने नम्रता शिरोडकरने आपल्या पती आणि मुलांना उद्देशून थ्री मस्केटियर्स म्हटले आहे.
नम्रताच्या भेटीसाठी महेश बाबू मुलांसह पॅरिसमध्ये दाखल - फोटोवरुन असे दिसते की अभिनेत्री नम्रता अद्याप पॅरिसमध्ये आहे, जिथे महेश बाबू आणि गौतम तिच्यासोबत सामील झाले. नम्रता शिरोडकर, तिची मुलगी सितारा घट्टामनेनीसह, युरोपातील सर्वात रोमँटिक शहरांपैकी एक असलेल्या पॅरिसमध्ये खूप छान वेळ घालवत होती. तिने तिच्या चाहत्यांना तिच्या सुट्टीतील फोटोंसह ट्रीट केले, ज्यामध्ये तिची बहीण शिल्पा देखील तिच्यासोबत होती. त्यांच्या नियोजनानुसार त्यांना पॅरिस फिरुन झाल्यानंतर त्यांच्या पसंतीचे सुट्टीचे ठिकाण असलेल्या स्वित्झर्लंडला जायचे आहे. यासाठी महेश बाबू आणि त्यांचा मुलगा गौतम हे सितारासह निघाल्याची बातमी हैदराबाद विमानतळावरुन मिळाली होती.
महेश बाबू आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास १२ वर्षानंतर पुन्हा एकत्र - व्यावसायिक आघाडीवर, सुपरस्टार महेश बाबू त्रिविक्रम श्रीनिवाससोबत SSMB28 असे वर्कींग टायटल असलेल्या एका चित्रपटात दिसणार आहेत. अथाडू आणि खलेजाच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर महेश बाबू आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकत्र सिनेमा बनवणार आहेत. ही जोडी 12 वर्षांनंतर एका चित्रपटासाठी एकत्र येत आहे. आगामी सिनेमात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री श्रीलीला देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश बाबू त्यानंतर आरआरआर डायरेक्टर एस एस राजामौली यांच्यासाठी त्यांच्या पुढील प्रोजेक्ट SSMB29 वर काम सुरू करणार आहे.
हेही वाचा - Motion Poster Of Satyashodhak : महात्मा फुलेंच्या जीवनावरील सत्यशोधक चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च