ETV Bharat / entertainment

Naga Chaitanya about marriage : नागा चैतन्यने सामंथा प्रभूसोबतच्या अयशस्वी लग्नाबद्दल केले खुलासे

नागा चैतन्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सामंथा प्रभूसोबतच्या त्याच्या अयशस्वी लग्नाबद्दल चर्चा केली. सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याने शोभिता धुलिपालासोबत डेटिंगच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षपणे काही खुलासे केले आहेत.

Naga Chaitanya
नागा चैतन्य
author img

By

Published : May 10, 2023, 5:28 PM IST

Updated : May 10, 2023, 5:37 PM IST

हैदराबाद: अभिनेता नागा चैतन्य, सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'कस्टडी'चे प्रमोशन करत आहे. त्याने आपल्या सामंथा प्रभूसोबतच्या त्याच्या अयशस्वी लग्नाबद्दल काही खुलासे केले आहेत. त्याने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सामंथासोबतच्या त्याच्या तुटलेल्या लग्नाबद्दल चर्चा केली. नागा चैतन्य म्हणाला, 'माझ्या वैवाहिक जीवनात माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे काही घडले ते खूप दुर्दैवी आहे. पण माझ्या आयुष्यातील त्या टप्प्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. मीडिया रिपोर्टिंगच्या वाईट चित्रणांमुळे आमच्या नात्याचा संपूर्ण आदर नाहीसा झाला आहे. लोकांच्या दृष्टीकोनातून या गोष्टीचा अवमान झाला आहे. यामुळेच मला खूप वाईट वाटले.

घटस्फोटासाठी संमती : न्यायालयाने आम्हाला एक वर्षापूर्वी घटस्फोटासाठी परस्पर संमती दिली होती. माझ्या जीवनातील प्रेम आणि इतर लोकांशी असलेल्या संबंधांबद्दलच्या अफवांमुळे मी दुखावला गेलो आहे. पुढे तो म्हणाला फक्त हेडलाईनसाठी माझ नाव कुठल्याही व्यक्तीबरोबर नाव जोडत आहेत. यामध्ये कुठेही दुसऱ्या व्यक्तीचा दोष नसतांना देखील नाव ओढले जात आहेत. जे काही आधी माझ्यासोबत घडले ते आता सोडून द्यायला पाहिजे. आता त्यांनी इथेच थांबावे कारण माझ्या स्पष्टीकरणासह पुढे जावे ,अशी माझी इच्छा आहे. 'ये माया चेसावे' चित्रित करताना नागा चैतन्य आणि सामंथा प्रेमात पडले आणि 2017 मध्ये, ते लग्न बंधनात अडकले होते. मात्र त्यांचे नात फार काळ टीकू शकले नाही.

अधिकृतपणे घटस्फोट : मात्र काही काळातच या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि ते आता वेगळे होणार, असं पोस्टद्वारे सांगितले. त्यावेळी कोणाला या गोष्टीचा विश्वास बसला नव्हता. या दोघांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. गेल्यावर्षी त्यांनी अधिकृतपणे घटस्फोटही घेतला. घटस्फोटानंतर आता हे दोघं आपापलं जीवन स्वतंत्रपणे जगू लागले आहेत. दरम्यान हे दोघेजण आता कुणाला डेट करत आहेत, याच्या चर्चा नेहमीच रंगतांना दिसत असतात. रिपोर्टनुसार नागा 'मेड इन हेवन' फेम शोभिता धूलिपाला बरोबर रिलेशनमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याचंही सांगितलं जातं आहे. नागा आणि शोभिता दोघेही अनेकदा कारमधून जाताना स्पॉट झाले. या दोघांमध्ये खरोखरच प्रेम आहे की हे दोघेजण फक्त चांगले मित्र आहेत, हे येणाऱ्या काळात कळेल.

हेही वाचा : Priyanka Chopra collapsed : रेड कार्पेटवर कोसळल्यानंतर प्रियांका चोप्राला धक्का, वाचा काय घडले...

Last Updated : May 10, 2023, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.