हैदराबाद - गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, आता आरआर चित्रपटामधील नाटू नाटू हे गाणे ऑस्कर 2023 जॅझ करण्यासाठी सज्ज झाले आहे. आरआरआरमधील या गाण्याचे मूळ गायक राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव ही जोडी 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये थेट सादर करणार असल्याची घोषणा अकादमीने मंगळवारी केली.
सिपलीगुंज आणि काळ भैरव ही जोडी ऑस्करमध्ये गाणार नाटू नाटू - ट्विटरवर अकादमीने शेअर केले की ऑस्करमध्ये नाटू नाटू हे भरपूर एनर्जी असलेले गाणे सादर केले जाईल. एमएम कीरवानी यांनी संगीतबद्ध केलेले आणि चंद्रबोस यांनी लिहिलेले, नाटू नाटू हे गाणे एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआरमधील सर्वाधिक चर्चेत असलेला सीक्वेन्स म्हणून उदयास आले आहे. आरआरआर चित्रपटातील आघाडीचे नायक ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या चित्तथरारक नृत्याच्या हालचालींसह संगीतकार किरवानींच्या विद्युतीय संगीत रचनेने नाटू नाटू हा एक अविस्मरणीय पराक्रम बनवला आहे.
-
Rahul Sipligunj and Kaala Bhairava. “Naatu Naatu." LIVE at the 95th Oscars.
— The Academy (@TheAcademy) February 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tune into ABC to watch the Oscars LIVE on Sunday, March 12th at 8e/5p! #Oscars95 pic.twitter.com/8FC7gJQbJs
">Rahul Sipligunj and Kaala Bhairava. “Naatu Naatu." LIVE at the 95th Oscars.
— The Academy (@TheAcademy) February 28, 2023
Tune into ABC to watch the Oscars LIVE on Sunday, March 12th at 8e/5p! #Oscars95 pic.twitter.com/8FC7gJQbJsRahul Sipligunj and Kaala Bhairava. “Naatu Naatu." LIVE at the 95th Oscars.
— The Academy (@TheAcademy) February 28, 2023
Tune into ABC to watch the Oscars LIVE on Sunday, March 12th at 8e/5p! #Oscars95 pic.twitter.com/8FC7gJQbJs
सिपलीगुंज आणि काळ भैरव ही गायक जोडी हे गाणे १२ मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये सादर करतील. आरआरआरमधील नाटू नाटू हे गीत ऑस्कर २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या ट्रॉफीच्या शर्यतीत आहेत. याच श्रेणीतील इतर नामांकित व्यक्ती आहेत डायन वॉरेन , रिहाना, लेडी गागा आणि डेव्हिड बायर्न. या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याशिवाय सुप्रसिध्द आंकरराष्ट्रीय गायिका रिहाना 'लिफ्ट मी अप' हे ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर या चित्रपटातील गीत सादर करणार आहे. ऑस्कर 2023 मध्ये जे जिमी किमेल होस्ट करेल आणि ABC वर या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रसारण होणार आहे.
जिमी किमेलची ऑस्करमध्ये होस्ट म्हणून हॅट्रीक - जिमी किमेल तिसऱ्यांदा ऑस्कर सोहळ्यात पुनरागमन करणार आहे. त्यांनी 2017 आणि 2018 मध्ये ऑस्करचे होस्ट म्हणून आयोजन केले होते. त्याचे चित्रपटांवरील अभ्यास व प्रेम, थेट टीव्ही कौशल्य आणि आमच्या जागतिक प्रेक्षकांशी सहज संपर्क साधण्याची क्षमता जगभरातील आमच्या लाखो दर्शकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करणारा असतो, असे अकादमीचे अध्यक्ष जेनेट यांग यांनी म्हटले होते. या ऑस्कर सोहळ्याच्या शोची निर्मिती व्हाईट चेरी एंटरटेनमेंटचे ग्लेन वेइस आणि रिकी किर्शनर हे कार्यकारी निर्माते आणि शो रनर म्हणून काम करतील. ग्लेन वेइस सलग आठव्या वर्षी या शोचे दिग्दर्शन करणार आहे.
हेही वाचा - National Award Winner Ritika Singh : रितिका सिंहच्या फर्स्ट लुकनंतर इनकारचा ट्रेलर प्रदर्शित