ETV Bharat / entertainment

"माझ्या भावाने जग हादरवलं": 'अ‍ॅनिमल' पाहून सनी देओलची प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 1:39 PM IST

Sunny praised Bobby Deol : बॉबी देओलनं 'अ‍ॅनिमल' चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं त्याचा भाऊ सनी देओलनं कौतुक केलंय. त्यानं आपल्या अभिनयानं जग हादरवून सोडल्याचं म्हटलंय.

Sunny praised Bobby Deol
अ‍ॅनिमल पाहून सनी देओलची प्रतिक्रिया

मुंबई - Sunny praised Bobby Deol : 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून बॉबी देओलची चर्चा सुरू आहे. त्यानं साकारलेल्या खलनायकानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय. हा चित्रपट आता थिएटरमध्ये रिलीज झाला असून बॉबीवर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉबीचा मोठा भाऊ आणि अभिनेता सनी देओलकडूनही त्याच्या भूमिकेचं कौतुक झालंय. इंस्टाग्रामवर सनीने लिहिले, "माझ्या लहान भावाच्या गन फायरिंग यशाने जगाला हादरवून सोडलं आहे!"

सनीने बॉबीसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सनी देओलच्या डोळ्यात अश्रू तरळ्याचं दिसतंय. त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना बॉबीनं लिहिलंय, "तू माझ्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रेम करतोस." अलिकडेच सनी देओलचा गदर 2 हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. या यशाचा आनंद बॉबी देओलनंही साजरा केला होता. दोन भावांच्यात असलेलं प्रेमाचं नात अतिशय घट्ट आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, शक्ती कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख आहेत. निर्मात्यांनी रिलीजच्या दिवसापर्यंत बॉबीचे पात्र गुलदस्त्यात ठेवलं होतं. गेल्या महिन्यात निर्मात्यांनी 'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले होते. ट्रेलर पाहून लोक भारावून गेले होते. ट्रेलरमध्ये बॉबीसाठी एकही संवाद नव्हता. पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो सर्वाधिक भाव खाऊन जाताना दिसतोय. त्याचा आणि रणबीरचा पडद्यावरील संघर्ष थरराक आहे.

बॉबीने 1995 मध्ये ट्विंकल खन्नासोबत 'बरसात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 'सोल्जर', 'बादल', 'गुप्त', 'रेस 3', 'झूम बराबर झूम' आणि 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. असे असले तरी त्याची कारकीर्द 2000 च्या उत्तरार्धात कुठेतरी हरवल्याचं दिसलं होतं.

प्रदीर्घ कालावधीनंतर बॉबी देओलनं 2018 च्या 'रेस 3' मध्ये पुनरागमन केले, 'क्लास ऑफ '83' आणि 'आश्रम' ही हिट मालिकाही दिल्यात्याच्या 'लव्ह हॉस्टेल'मधून बॉबीच्या अभिनयाचा कस लागलेला पाहायला मिळाला होता.

हेही वाचा -

1. विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक, मेघना गुलजारच्या दिग्दर्शनावर टीका

2. देशभरात सर्वत्र 'अ‍ॅनिमल' मॅनिया, चाहत्यांनी ठरवलं ब्लॉकबस्टर

3. अंकिता लोखंडेनं मुनावर फारुकीपासून स्वतःला केलं दूर, तर खानजादीला सोडायचा आहे शो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.