ETV Bharat / entertainment

Motion poster of The Railway Men : भापाळ वायू गळतीत शेकडोंना वाचवणाऱ्या 'द रेल्वे मेन'चे मोशन पोस्टर रिलीज

Motion poster of The Railway Men : आर माधवन, के के मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'द रेल्वे मेन' च्या निर्मात्यांनी मालिकेच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी वेब सिरीजचे मोशन पोस्टर रिलीज करुन चार भागांची ही मालिका नेटफ्लिक्सवर सुरू होणार असल्याचं कळवलंय.

Motion poster of The Railway Men
द रेल्वे मेनचे मोशन पोस्टर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 3:59 PM IST

मुंबई - Motion poster of The Railway Men : नवीन थरारक वेब सिरीज 'द रेल्वे मेन' च्या निर्मात्यांनी यातील पात्र परिचय करुन देणाऱ्या मोशन पोस्टरची झलक शेअर केली आहे. सुरूवातील तोंडावर कापड गुंडाळलेले चार चेहरे दिसतात. रेल्वेच्या धडधडीसह त्यांचे तोंडावरील कापड बाजूला जातं आणि चार चोहरे ओळखू लागतात. हे चार जण आहेत बॉलिवूडचे प्रतिभावान कलाकार आर माधवन, के के मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलंय, दुःखांच्या काळात मानवतेच्या लढ्याची कहाणी. सत्यकथेवर आधारित असलेली ही मालिका १८ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर झळकणार आहे!

चार भागांच्या या मालिकेचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक शिव रवैल यांनी केलं आहे. भोपाळ गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या सत्यकथेवर आधारित या मालिकेची कथा आहे. वायु गळतीची आपत्ती घडल्यानंतर शहरात शकडो निरपराध लोक मरत असताना या असहाय्य लोकांच्या मदतीला आपल्या कर्तव्यच्या पलिकडे जाऊन रेल्वे कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनी शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण वाचवले. पण याची नोंद इतिहासात पुसली गेली. अशा या गायब झालेल्या नायकांची मार्मिक कथा या मालिकेतुन उलगडणार आहे. यात आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

2 डिसेंबर 1984 च्या अखेरीस अमेरिकन युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनच्या मालकीच्या कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली. त्या रात्री अर्धा दशलक्षाहून अधिक लोकांना विषबाधा झाली होती आणि अधिकृत मृतांची संख्या 5,000 पेक्षा जास्त होती. हजारो वाचलेल्यांनी म्हटलंय की ते, त्यांची मुले आणि नातवंडे गळतीमुळे कॅन्सर, अंधत्व, श्वसनाचा त्रास आणि न्यूरोलॉजिकल समस्या यासारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांशी झुंज देत आहेत. जे लोक यात मयत झाले त्यातील अनेकांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.

'द रेल्वे मेन' ही मालिका 18 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे.

हेही वाचा -

  1. Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियांका चोप्रा येणार मायदेशी; फोटो केला शेअर...

2. Deepika Ranveer Wedding Video : दीपिका आणि रणवीर सिंगची वेडिंग फिल्म्स 'कॉफी विथ करण 8' मध्ये लॉन्च

3. Elvish Yadav Extortion Call: एल्विश यादवकडून खंडणी मागणारा गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.