मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या 'बेबीबंप'वर सूर्यचा प्रकाश पडतांना दिसत आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची बिकिनी घातलेली आहे. इलियानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे ज्यात ती समुद्रकिनाऱ्यावर बेबीमून एन्जॉय करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये इलियाना तिचा ब्लूमिंग बेबी बंप दाखवताना दिसत आहे. शेअर करत तिने कॅप्शन दिले, 'सूर्यकिरणांचा आनंद लुटला, मला असे वाटते की बेबी नगेटलाही ते आवडले असेल'. असे तिने लिहले. एका फोटोमध्ये तिचे पाय वाळूत आहे शिवाय तिने दुसरा व्हिडिओ हा समुद्राचा पोस्ट केला आहे. तसेच ती दुसऱ्या एका फोटोमध्ये सनग्लास लावून पिवळ्या रंगाच्या बिकणीत दिसत आहे. इलियानाने एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाबद्दल सोशल मीडियावर घोषणा केली होती. तिने आतापर्यत तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या वडिलांबद्दल काही शेअर केले नाही आहे.
इलियाना कोणाला करत आहे डेट : मीडिया रिपोर्टनुसार दावा करण्यात आला होता की इलियाना कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. गेल्या वर्षी करण जोहरने त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टिन लॉरेंट इलियाना डेट करत असल्याचा खुलासा करताना कॅटरिनाला प्रश्न विचाराला होता यावर कॅटरिना मान्य केले होते की दोघेही डेट करत आहे. इतकंच नाही तर गेल्या वर्षी मालदीवमध्ये कॅटरिनाच्या वाढदिवसाला इलियानाही उपस्थित होती, त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इलियानाने एका पुरुषासोबतचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला होता. ज्यात फक्त त्या माणसाच्या हाताची झलक दिसत होती. त्या फोटोमध्ये तिने तिच्या अनामिकेत घातलेली हिऱ्याची अंगठी देखील दाखवली होती.
वर्कफ्रंट : फोटोत त्यांचा चेहरा उघड न करता, तिने लिहिले, 'माझी आयडिया आणि माझे रोमान्स' त्यानंतर अनेकांना हेच वाटत आहे की इलियानाच्या बाळाचा वडिल हा व्यक्ती असेल. दरम्यान इलियानाच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर ती अखेर अभिषेक बच्चनसोबत 'द बिग बुल'मध्ये दिसली होती. हा चित्रपट कुकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केला होता आणि हा चित्रपट अजय देवगण निर्मित होता. पुढे ती रणदीप हुड्डासोबत 'अनफेअर अँड लव्हली'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :