ETV Bharat / entertainment

Mithun Health update: काळजीचे कारण नाही, मिथुन चक्रवर्तींच्या प्रवक्त्याचा खुलासा

author img

By

Published : May 3, 2022, 10:42 AM IST

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती ( Mithun Chakraborty ) यांना तीव्र पोटदुखी, ताप आणि तत्सम लक्षणांच्या तक्रारींनंतर बेंगळुरूच्या रुग्णालयात ( Bengaluru hospital ) दाखल करण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज ( discharged )मिळाला असून काळजी करण्यासारखे काहीही नाही, असे अभिनेत्याच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले.

मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती ( Mithun Chakraborty ) यांना अलिकडेच बेंगळुरूच्या रुग्णालयात ( Bengaluru hospital ) दाखल करण्यात आले होते, त्यांना डिस्चार्ज ( discharged ) देण्यात आला आहे. चक्रवर्ती यांची हॉस्पिटलला भेट ही नियमित तपासणीचा भाग होती आणि काळजी करण्यासारखे काहीही नाही, असे अभिनेत्याच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले.

"मिथुनदा नियमित तपासणीसाठी गेले होते आणि काळजी करण्यासारखे काही नाही. ते आता घरीच आहेत व पूर्णपणे तंदुरुस्त आणि ठीक आहेत. घाबरण्याचे कारण नाही," असे प्रवक्त्याने सांगितले. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ अनुपम हाजरा ( Dr Anupam Hazra ) यांनी "लवकर बरे व्हा मिथुन दा" असे ट्विट केल्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू असतानाचा फोटो ऑनलाइन समोर आला आणि चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले.

दरम्यान अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनमुळे आरोग्याच्या समस्या होत्या, असे त्यांचा मोठा मुलगा मिमोह चक्रवर्ती यांनी सांगितले. तीव्र पोटदुखी, ताप आणि तत्सम लक्षणांच्या तक्रारींनंतर मिथुन यांना बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चित्रपट निर्माते मृणाल सेन यांच्या 1976 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मृगया या नाटकातून अभिनयाचा प्रवास सुरू करणारे चक्रवर्ती डिस्को डान्सर, डान्स डान्स, कसम पैदा करने वाले की आणि कमांडो यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जातात. अलिकडेच रिलीज झालेल्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये मिथुन चक्रवर्ती मोठ्या पडद्यावर दिसले होते.

हेही वाचा - Met Gala 2022 : 'मेट गाला २०२२' मध्ये सब्यसाची साडीत अवतरली नताशा पूनावाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.