होबार्ट AUS vs PAK 3rd T20I Live Streaming : ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तान संघाचा 13 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघानं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जॉश इंग्लिशच्या खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचं नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मालिका गमावूनही पाकिस्ताननं सामन्याच्या दोन तासाआधीच प्लेइंग 11 जाहीर केली आहे.
Australia are victorious in the second T20I by 13 runs.#AUSvPAK pic.twitter.com/zc3ccn1eno
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 16, 2024
दुसऱ्या सामन्यात काय झालं : दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉश इंग्लिसनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 20 षटकांत 148 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19.4 षटकांत केवळ 134 धावाच करु शकला.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 27 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं 11 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. हेड टू हेड रेकॉर्ड पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला हरवणं पाकिस्तानसाठी तितकं सोपं नसेल.
Maiden T20I half-century for Usman Khan! 👏#AUSvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/Be7igmegbD
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 16, 2024
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा T20 सामना कधी होणार?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना आज सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना कधी, कुठं आणि कसा पाहायचा?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही डिस्नी+हॉटस्टार ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
Pakistan playing XI for the third T20I against Australia 🏏#AUSvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/BXwXMmEetM
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 18, 2024
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
ऑस्ट्रेलिया : जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट, जॉश इंग्लिस (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन.
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), बाबर आझम, साहिबजादा फरहान, उस्मान खान, आगा सलमान, इरफान खान, हसिबुल्ला खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह.
हेही वाचा :