मुंबई : हॉलिवूड स्टार टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट १' हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. दरम्यान, आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे. मिशन इम्पॉसिबल ७ या चित्रपटाचा क्रेझ भारतीय चाहत्यांमध्ये खूप आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचा क्रेझ बघता हा चित्रपट ५ दिवसात ५० कोटींचा आकडा गाठेल असे दिसत आहे. दरम्यान आता आपण बघूया या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिस आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मिशन इम्पॉसिबल ७चे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन : 'मिशन इम्पॉसिबल ७' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर तिसर्या दिवशी ९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तसेच दुसऱ्या दिवशीदेखील या चित्रपटाने ९ कोटी रुपये कमविले आहे. हा चित्रपट भारतात प्रचंड कमाई करत आहे. चौथ्या दिवशी (शनिवारी) आणि पाचव्या दिवशी (रविवारी) हा चित्रपट खूप मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. कारण या वीकेंडमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल असे दिसून येत आहे. दरम्यान या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शनचा अंदाज ६३ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्तचा आहे.
चित्रपटगृहामध्ये होत आहे गर्दी : ख्रिस्तोफर मॅक्वेरी दिग्दर्शित 'मिशन इम्पॉसिबल'चा सातवा भाग हा रूपेरी पडद्यावर खूप धुमाकूळ घालत आहे. या अॅक्शन चित्रपटात टॉम क्रूझ व्यतिरिक्त हेली एटवेल, विंग राम्स, रेबेका फर्ग्युसन, सायमन पेग, एसाई मोरालेस, व्हेनेसा किर्बी, पॉलमे लेमेंटिफ आणि हेन्री जर्न हे देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला बघण्यासाठी खूप गर्दी चित्रपटगृहामध्ये होत आहे. विशेष म्हणजे, भारतात चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडला २५ हजारांहून अधिक एडवान्स बुकिंग तिकिटे विकली गेली, ज्यामध्ये १२ हजार एडवान्स तिकिटे फक्त ओपनिंगसाठीच विकली गेली. ओपनिंग वीकेंडपर्यंत हा चित्रपट जगभरात $२५० दशलक्षपर्यंत कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
हेही वाचा :