ETV Bharat / entertainment

Mission Impossible 7 box office: सहाव्या दिवशी मिशन इम्पॉसिबल- ७ने भारतीय बॉक्स ऑफिसवर मारली बाजी - मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट १

मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. करिश्माई टॉम क्रूझ अभिनीत आणि क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी कुशलतेने दिग्दर्शित केलेला, हा चित्रपट आश्चर्यकारक यश मिळवत आहे.

Mission Impossible 7
मिशन इम्पॉसिबल ७
author img

By

Published : Jul 18, 2023, 6:17 PM IST

मुंबई : मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ ने १२.३ कोटी रुपयांची प्रभावी कमाई करून बॉक्स ऑफिसवर आपली क्षमता प्रदर्शित केली आहे. चित्रपटाने ६व्या दिवसात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ६ दिवसांच्या अखेरीस चित्रपटाची कमाई ६८.५० कोटींवर पोहोचली आहे. टॉम क्रूझ हा चित्रपट जगभरात धमाकेदार कमाई करत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते मिशन इम्पॉसिबल -७ने ६व्या दिवशी ५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरेल कारण वींकेडच्या दिवसात हा चित्रपट खूप कमाई करत आहे, त्यामुळे पुढील शनिवार आणि रविवारी चित्रपट्याच्या कमाईचा आकडा हा खूप मोठा असू शकतो.

मिशन इम्पॉसिबल ७ : भारतीय बॉक्स ऑफिसवर इतकी स्पर्धा असूनही, मिशन इम्पॉसिबल ७ हा १०० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज आहे. मिशन इम्पॉसिबल ७ लवकरच १०० कोटीच्या कल्बमध्ये जाणार असा अंदाज वर्तविला जात आहे. टॉम क्रूझच्या चित्रपटाचे जागतिक यश देखील लक्षात घेण्यासारखे आहे, कारण मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ने जगभरात सुमारे $२३० - २३५ दशलक्ष इतके प्रभावी वीकेंड कलेक्शन कमावले. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस्तोफर मॅकक्वेरी यांनी केले आहे. मिशन इम्पॉसिबल -७ चित्रपटात सायमन पेग, हेली एटवेल, विंग रेम्स, रेबेका फर्ग्युसन आणि व्हेनेसा किर्बी यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॉम क्रूझने केले धोकादायक स्टंट : टॉम क्रूझने या चित्रपटात एथन हंट नावाच्या गृप्तहेराची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात टॉम क्रूझचे खूप धोकादायक स्टंट पाहायला मिळतात. मिशन इम्पॉसिबल -७ चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. तसेच हा चित्रपट निर्मित करण्यासाठी २९१ दशलक्ष लागले आहे. ३ वर्षांत विकसित झालेल्या सर्वात लोकप्रिय आणि महागड्या अमेरिकन चित्रपटाने आता प्रभावी कमाई केली आहे. येणाऱ्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2's first song Oonchi Oonchi Vaadi Out : 'ओएमजी-२ चित्रपटामधील 'ऊॅंची ऊॅंची वादी' गाणे झाले प्रदर्शित...
  2. Dilon Ki Doria song release : 'बवाल' चित्रपटातील वरुण धवन आणि जान्हवी कपूरवर चित्रीत 'दिलों की डोरिया' गाणे रिलीज
  3. Project K : 'प्रोजेक्ट के' चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.