मुंबई: हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ स्टारर चित्रपट मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १'ने बॉक्स ऑफिवर जोदरदार धमाका केला आहे. या चित्रपटात टॉमचे धोकादायक स्टंट्स आहे. याशिवाय हा चित्रपट भारतात नव्हे तर जगभरात देखील फार कमाल करत आहे. हा चित्रपट १२ जुलैपासून देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. टॉम क्रूझचे चाहते खूप दिवसांपासून मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटात टॉम क्रूझने धोकादायक स्टंट केले आहेत. हा चित्रपट भारतात सुमारे २५,०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. तसेच सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार जास्त कमाल करताना दिसत आहे. चला तर बघूया या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई...
मिशन इम्पॉसिबल 7 ची पहिल्या दिवशी कमाई : अभिनेता टॉम क्रूझने भारतीय प्रेक्षकांवर मनोरंजनाचे भुरळ टाकले आहे. टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल ७' ने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर १२.५० कोटीची कमाई करत दमदार पदार्पण केले आहे. हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे मिशन इम्पॉसिबल ७ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी मिशन इम्पॉसिबल ६ पेक्षा जास्त कमाई केली आहे. मिशन इम्पॉसिबल ६ हा चित्रपट भारतात २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यावेळी या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटी रुपये कमाविले होते. मिशन इम्पॉसिबल ७ च्या सुरुवातीच्या वीकेंडसाठी २५००० तिकिटे आधीच बुक करण्यात आली आहेत. दरम्यान पहिल्या दिवशी या चित्रपटाची तिकिटे १२ हजारांहून अधिक विक्री झाली आहे.
मिशन इम्पॉसिबल 7 : टॉम क्रूझने मिशन इम्पॉसिबल या चित्रपटाच्या मालिकेत हंट नावाच्या गुप्तहेर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याची आयएमएफ ( IMF)टीम हे माणुसकी टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक मिशन करण्यास तयार असतात. या चित्रपटात फार जास्त अॅक्शन आहे त्यामुळे हा चित्रपट फार जणांना आवडतो. या चित्रपट टॉम क्रूझ व्यतिरिक्त सायमन पेग, विंग राम्स, हेली एटवेल, रेबेका फर्ग्युसन, एसाई मोरालेस, व्हेनेसा किर्बी, पॉलमे लेमेंटिफ आणि हेन्री जर्न हे देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे बजट २९० यूएस (US) डॉलर इतके आहे.
हेही वाचा :